राहाता (अहिल्यानगर) येथे ९ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीचा विनयभंग करणार्‍या पाद्र्याला अटक !

राहाता (अहिल्यानगर) – येथील एका प्रार्थनास्थळाच्या परिसरात एका ५८ वर्षीय ख्रिस्ती पाद्र्याने ९ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजय योसेफ पंडित असे आरोपीचे नाव असून लोणी पोलिसांनी या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पीडित मुलीचे बालकल्याण समितीसमोर म्हणणे नोंदवण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांनुसार या गुन्ह्याचे दोषारोपपत्र ५ ते ६ दिवसांच्या आत न्यायालयात सादर केले जाणार आहे. हा खटला जलद गतीने सुनावणीसाठी घेतला जावा, अशी विनंती सरकारी अधिवक्त्यांच्या वतीने न्यायालयाला करण्यात येणार आहे.