ISI Agent Arrest : पाकसाठी हेरगिरी करणार्‍यांना पैसे पोचवणार्‍या हस्तकाला अटक

रफीक चंद शेख

जयपूर (राजस्तान) – राजस्थान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय.एस्.आय.साठी (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेसाठी) काम करणार्‍या रफीक चंद शेख या हस्तकाला अटक केली आहे. रफीक गेल्या ४ वर्षांपासून आय.एस्.आय.च्या सूचनेनुसार भारतातील हेरगिरी जाळ्याशी जोडलेल्या लोकांना पैसे पोचवण्याचे काम करत होता. पाकिस्तानमधून येणारी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे पाठवली जात होती, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. या यंत्रणेच्या माध्यमातून एकूण किती रक्कम भारतात पाठवली गेली, याचा शोध यंत्रणा घेत आहेत.

रफीकने केवळ स्वतःच्याच नावावर नाही, तर इतर लोकांच्या नावावरही अनेक बँक खाती उघडली होती. पाकिस्तानमधून येणारी रक्कम आधी या खात्यांमध्ये पाठवली जायची. हा पैसा त्या लोकांपर्यंत पोचवला जात होता, जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या किंवा संवेदनशील माहिती गोळा करण्याच्या आरोपांमुळे तपासाच्या कक्षेत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !