हिंदूबहुल भारतात ‘हिंदु’ म्हणून झालेले आघात !
बंगालमध्ये एका अल्पवयीन हिंदु युवतीची आत्महत्या

नवी देहली – देशभरात हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या षड्यंत्राने भयावह रूप धारण केले आहे. गेल्या २४ घंट्यांत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बंगाल राज्यांत ‘लव्ह जिहाद’च्या ९ घटना उघड झाल्या. या ९ घटनांचा वृत्तांत असा…
१. उत्तरप्रदेश (४ घटना)
कानपूर – अरमान नावाच्या लव्ह जिहाद्याने एका १७ वर्षीय हिंदु मुलीला जाळ्यात ओढले. त्याच्या २ साथीदारांसमवेत तिचे अपहरण केले आणि ६ दिवस स्वत:च्या घरात कोंडून ठेवले. या कालावधीत पीडितेला बुरखा घालण्यास आणि ‘कलमा’ म्हणण्यास भाग पाडले गेले, प्रतिबंधित मांस (बहुधा गोमांस) खायला घालण्यात आले, तसेच गरम चिमट्याने चटकेही देण्यात आले. तिला सौदी अरेबियात विकून टाकण्याची धमकीही दिली गेली. पोलिसांनी अरमानला अटक केली असून त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
औरैया – जिल्ह्यातील सेंगनपूर गावात आकाश नावाच्या एका हिंदु पुरुषासमवेत पळून गेलेल्या एका मुसलमान महिलेने आर्य समाज मंदिरात त्याच्याशी विवाह केला. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना कह्यात घेऊन न्यायालयात उपस्थित केले. या वेळी महिलेने म्हटले की, तिला तिच्या कुटुंबियांकडे जायचे आहे; परंतु तिच्या हिंदु पतीने इस्लाम स्वीकारल्यास ती त्याच्यासमवेत रहाण्यास सिद्ध आहे. सध्या महिलेला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हापूर – जिल्ह्यातील सलाई गावातील हुसेन नावाच्या तरुणाने त्याच्या एका साथीदारासह कथित हिंदु प्रेयसीचे घर गाठले. घरी जाऊन त्याने तिच्याकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. तिने त्यास विरोध केला असता तिला जिवे मारण्याची धमकी देत हवेत तीन गोळ्या झाडल्या. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सध्या पसार आहेत.rasg
लक्ष्मणपुरी – येथील आशियाना भागात रहाणार्या इरशाद अहमद याने वर्ष २०२२ मध्ये इन्स्टाग्रामद्वारे ‘राहुल’ असल्याचे भासवत एका हिंदु तरुणीला जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिची अश्लील छायाचित्रे काढली. पुढे तिने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर त्याने तिच्याशी मंदिरात विवाह करण्याचे नाटक केले. कालांतराने पीडितेला त्याची खरी ओळख समजली, तसेच तो आधीपासून विवाहित असल्याचेही कळाले. तिने त्याला जाब विचारला असता त्याने तिला अश्लील छायाचित्रांवरून धमकावले, सहस्रो रुपये उकळले आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. पोलिसांनी इरशाद अहमद याला अटक केली आहे.
२. मध्यप्रदेश (४ घटना)
जबलपूर – सय्यद इशाक असरार नावाच्या युवकाने स्वत:ला ‘राजकुमार’ नावाचा दंतचिकित्सक असल्याचे भासवले. या माध्यमातून त्याने ३ हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिघींपैकी कोलकात्यातील पीडितेने त्याच्या जाचाला कंटाळून पोलिसांत तक्रार केली. विहिंपने सय्यदवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जबलपूर येथील अन्य एका घटनेत नेक अली खान नावाच्या एका व्यक्तीने स्वतः ‘अंकित’ असल्याचे भासवून फेसबुकद्वारे एका हिंदु महिलेशी मैत्री केली. तिचे लैंगिक शोषण केले, विवाहाचे आश्वासन देत तो तिच्यासह ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (स्त्री आणि पुरुष यांनी विवाह न करता एकत्र रहाणे) राहिला. पीडितेचा आरोप आहे की, त्याने तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला, गोमांस खायला दिले आणि मुंबईत नेऊन ५ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. तेथून कशीबशी सुटका करवून घेऊन तिने ‘हिंदु धर्म सेने’च्या साहाय्याने जबलपूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.
३. बंगाल (१ घटना)
उत्तर २४ परगणा – जिल्ह्यातील बांगाव शहरातील गोपालनगरच्या गोपीनाथपूर येथे अल्पवयीन हिंदु तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी अझमीर मंडल याला अटक केली. पीडितेच्या कुटुंबियांनी अझमीर या तरुणावर हत्येचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपचे आमदार स्वप्न मजुमदार यांनी २८ जूनला पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचा संशय व्यक्त केला. आठवीत शिकणार्या या पीडितेचे अझमीरसमवेत प्रेमसंबंध होते. पुढे तिने त्याच्यासमवेत नाते तोडले; परंतु अझमीरला हे मान्य नव्हते. तो तिला सतत धमकावत. यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. शेवटी तिने २६ जूनला गळफास लावून आत्महत्या केली.
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !