‘लव्ह जिहाद’वरील व्याख्यानासाठी इचलकरंजी येथे ६०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २९ जून (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ची भयावहता दिवसेंदिवस वाढत असून हे जागतिक पातळीवरील संकट बनले आहे. युवती-मुली यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पालक वेळ देत नसल्याने त्या मित्र शोधतात आणि पुढे जाऊन बहुतांश प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ची शिकार होतात. पालकांनी दिवसातून किमान १५ मिनिटे तरी पाल्यांशी संवाद साधल्यास अनेक समस्या सुटू शकतील. यापुढील काळात हिंदु युवतींनी अबला न होता ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांना सामोरे जाण्यासाठी दुर्गेचे रूप धारण करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे ‘लव्ह जिहाद’वर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी सर्वांनी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित !’ या समितीच्या अभियानात सहभागी होण्याचा निर्धार केला. श्री. विपुल भोपळे यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘सांगली, संभाजीनगर, सातारा यांसह अनेक शहरांत काही ‘कॅफें’मध्ये २०० रुपये देऊन विशेष खोल्यांची व्यवस्था केली जाते. तेथेच हिंदु युवतींवर अत्याचार होतात आणि त्या ‘लव्ह जिहाद’ला भुलतात. त्यामुळे पालकांनी जागरूक होऊन त्यांची मुलगी कुठे जाते, याकडेही लक्ष दिले पाहिजे.’’
उपस्थित मान्यवर

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, श्री. दत्ता पाटील, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा संघटक श्री. रामचंद्र जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती सत्संगप्रमुख सौ. रेवती हणमसागर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी, शिवसेना जिल्हा संघटक श्री. मोहन मालवणकर, उद्योजक श्री. दिलीप पटेल, महिला आणि बालकल्याण सभापती सौ. रूपाली सातपुते, भाजपचे श्री. बाळकृष्ण तोतला, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंदा मकोटे, स्वकुळ साळी समाजाचे श्री. रामसागर पोटे, श्री. दत्तात्रय काजवे, सौ. कल्पना बागडे, उमीया सनातन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. भारतीबेन पटेल, गुजराती समाजाचे अध्यक्ष श्री. जयंतीभाई पटेल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला-युवती असे ६०० हून अधिकजण उपस्थित होते.
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृतीचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे. त्याला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृतीचे निष्ठेने पालन करणे आवश्यक आहे.
‘येत्या रक्षाबंधनाला हिंदु युवकांनी त्यांच्या बहिणींना ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट द्यावा’, असे आवाहन सद्गुरु स्वाती खाडये यांनी या प्रसंगी केले.
कार्यक्रमस्थळी व्याख्यान झाल्यावर उपस्थितांना त्यांचे मत नोंदवण्यासाठी विशेष फलक ठेवण्यात आला होता. ‘व्याख्यानातून ‘लव्ह जिहाद’ची दाहकता समजली, स्वरक्षण करण्याच्या उपाययोजना समजल्या, अशी व्याख्याने ठिकठिकाणी व्हायला हवीत’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी त्यावर नोंदवल्या.
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !