आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !


पंढरपूर –
आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात येणार असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. नियमबाह्य रिक्शा चालवणे, विनाअनुज्ञप्ती प्रवासी वाहतूक किंवा जादा प्रवासी वाहतूक करणे आणि मनमानी भाडे आकारणे असे प्रकार करणार्‍या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी भाविकांनी परिवहन विभागाच्या साहाय्य कक्षाचा दूरभाष क्रमांक ०२१७-२३०३०९९ यावर संपर्क साधावा. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि फसवणुकीमुक्त व्हावा, यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गजानन नेरपगार यांनी दिली.

प्रशासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या रिक्शाचालकांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार वाहनेही जप्त केली जाणार आहेत. सर्व रिक्शाचालकांनी वाहनाचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र, विमा, चालक अनुज्ञप्ती जवळ बाळगणे, तसेच भाडेपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.