महायुतीतच चुरस; उपसभापती पदासाठी डॉ. नीलम गोर्हे, डॉ. मनीषा कायंदे यांची नावे चर्चेत !
महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

मुंबई, २९ जून (वार्ता.) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी आगामी १ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेत याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून सध्याचे संख्याबळ पहाता हे पद महायुतीतील शिवसेनेकेडे जाण्याची दाट शक्यता आहे. या पदावर माजी उपसभापती आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्हे, आमदार (डॉ.) श्रीमती मनीषा कायंदे, कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी यांची नावे चर्चेत आहेत.
३० जून या दिवशी दुपारी १२ पर्यंत उमेदवारी आवेदन भरता येतील. दुपारी १ वाजता छाननी होईल. निवडणूक १ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता होईल. विधान परिषदेच्या कामकाजातील नियमांनुसार इच्छुक उमेदवाराला उपसभापती पदासाठी प्रस्तावाची लेखी सूचना विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्याकडे जमा करावी लागेल. डॉ. गोर्हे या माजी उपसभापती असून त्यांच्याकडे सभागृहाचे कामकाज चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा या पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना लागणार ‘मकोका’ !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा बोध आपण सर्वांनी घ्यायला हवा ! – प्रभात मेस्त्री, व्याख्याते
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले