वणवे लागण्याच्या १६ सहस्र घटनांमध्ये १२ सहस्र हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक !
वणवे रोखण्यासाठी ‘ऑस्ट्रेलिया’च्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार !

मुंबई, २९ जून (वार्ता.) – राज्यातील निसर्गसंपत्ती आणि वनसंपत्ती यांचा विनाश करणार्या आगीच्या घटनांवरून विधान परिषदेत सत्ताधारी अन् विरोधी पक्षांच्या आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राज्यात १६ सहस्र ८ वणवे लागण्याच्या घटना घडल्या असून यामध्ये १२ सहस्र ३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या सर्व आगी निसर्गनिर्मित नसून स्वार्थी माणसांनी लावलेल्या ‘मानवनिर्मित’ आगी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आग लावणार्या समाजकंटकांवर केवळ गुन्हे नव्हे, तर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदारांनी २९ जून या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात केली. आमदार अरुण लाड, संजय खोडके यांसह आदी आमदारांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
यावर उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, तेंदूपत्ता गोळा करणे आणि अरण्यातील फुले वेचणे, यांसाठी काही स्थानिक नागरिक अन् दलाल अरण्यात जाणीवपूर्वक आग लावतात, असे उघड कृत्य समोर आले आहे. कोकणातील चिपळूण येथे वणव्याच्या आगीत होरपळून एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही आग खासगी भूमीवर लागली होती. पीडित महिलेच्या वारसांना साहाय्य मिळण्यासाठी मी स्वतः विशेष लक्ष देईन, असे आश्वासन दिले.
वनमंत्री नाईक म्हणाले की, वनसंपत्तीचा नाश रोखण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा किंवा अधिकारी-कर्मचारी पुरेसे नाहीत. यासाठी पर्यावरणवादी, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक नागरिक, गावातील लोक, तसेच आमदार आणि खासदार या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. भविष्यात वणवे लागू नयेत म्हणून ‘ऑस्ट्रेलिया’सारख्या देशांमध्ये कोणती अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाते ?, तेथे किती यश मिळते ?, या सर्वांचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकार्यांचे एक पथक तेथे पाठवले जाईल.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !