निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (२२.६.२०२६) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यातील प्रीतीचे साधकाने उलगडलेले पैलू पुढे दिले आहेत.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. साधकांची काळजी घेणे
‘एकदा मी सेवेसाठी जळगावहून संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत जायला निघालो होतो. निघण्यापूर्वी मी सद्गुरु जाधवकाकांना (सद्गुरु नंदकुमार जाधव यांना) भेटलो. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘जळगावला उन्हाळा अधिक असल्यामुळे प्रवासात उन्हाचा त्रास होऊ नये; म्हणून तुम्ही बसमध्ये बसवाहकाच्या (‘कंडक्टर’च्या) बाजूला बसा.’’ तसे केल्यावर संभाजीनगर येईपर्यंत मला ऊन लागले नाही. ‘किती लहान लहान सूत्रांचा विचार करून संत साधकाला सांभाळत असतात !’, असा विचार मनात येऊन माझ्याकडून सद्गुरु जाधवकाकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
कोणतीही सेवा सद्गुरु नंदकुमार जाधव यांना विचारून केल्यावर ती सेवा परिपूर्ण होण्यामधील सर्व अडथळे दूर होणे

‘मला सेवेसाठी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी जावे लागते. तेथे जायला निघण्यापूर्वी मी सद्गुरु जाधवकाकांना सांगून जातो आणि त्यांना विचारून सेवा करतो. त्या वेळी ते मला ‘कसे जाणार आहात ? महाप्रसादाचे काही नियोजन केले आहे का ? सकाळचा अल्पाहार केला का ?’, असे विचारतात. सेवेला जायला निघणारा प्रत्येक साधक त्यांना सांगूनच जातो, तसेच त्यांना विचारून सेवा करतो. त्या प्रत्येक साधकाची ते वरीलप्रमाणे विचारपूस करतात. त्यामुळे साधकांना सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळते, तसेच सेवा परिपूर्ण होण्यामधील सर्व अडथळे दूर होऊन ती सेवा परिपूर्ण होते.’
– श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे (२०.२.२०२६)
२. चुकांची जाणीव प्रेमाने करून देणे
माझ्याकडून सेवांमध्ये काही त्रुटी रहातात, तसेच चुकासुद्धा होत असतात. मी सद्गुरु जाधवकाकांना त्याविषयी विचारल्यावर ‘साधना म्हणून या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. ‘ही गुरुसेवा आहे’, हा भाव न्यून पडतो; म्हणून चुका होतात’, याची जाणीव ते प्रेमाने करून देतात. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात आनंद आणि शांती यांची अनुभूती येते.
३. सद्गुरु नंदकुमार जाधव आजारी साधिकेला भेटण्यासाठी तिच्या घरी जाणे
एक साधिका जळगाव सेवाकेंद्राच्या जवळच एका सदनिकेमध्ये रहातात. त्या प्रतिदिन सेवाकेंद्रात सेवेसाठी येतात; परंतु एकदा त्यांचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले. त्यामुळे त्या सेवेला येऊ शकत नव्हत्या. सद्गुरु जाधवकाका त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी २ वेळा त्यांच्या घरी गेले.
‘आम्हा साधकांची काळजी घेण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सद्गुरु जाधवकाकांसारखे सद्गुरु आणि संत निर्माण केले आहेत’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७२ वर्षे), जळगाव (२०.२.२०२६)
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !