डोळ्यांखालील काळे डाग घालवण्यासाठी काय कराल ?

१. मानसिक तणाव, अ‍ॅलर्जी, अपचन, किंवा कुपोषणामध्ये डोळ्याखालील त्वचा काळसर दिसते.

२. चारोळी दुधात उगाळून लावावी. मंजिष्ठा दुधात उगाळून लावावी. जायफळ दुधात उगाळून लावावे.

३. कुटजारिष्ट २ – २ चमचे पोटात घेणे.

४. महामंजिष्ठादी काढा २ – २ चमचे २ वेळा

५. च्यवनप्राश २ चमचे सकाळी ६ आठवडे देणे.

दृष्टी सुधारण्याची औषधे

  • सुवर्णमालिनीवसंत : १२० मिलीग्रॅम २ वेळा ४ आठवडे घेणे
  • ब्राह्मीघृत : १-१ चमचा २ वेळा घेणे

(संदर्भ – सनातन-निर्मित ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून…’)


डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पायांच्या तळव्यांना तूप लावा !

वैद्या (सौ.) शर्वरी जोशी

प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना अर्धा चमचा देशी गायीचे साजूक तूप ५ मिनिटे चोळावे. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि झोपही शांत लागते. तूप चोळण्यास काशाच्या धातूची वाटी मिळाली, तर उत्तम; पण ती नसल्यास हाताच्या तळव्यांनी तूप चोळावे. तूप चोळल्यावर ते अंथरुणाला लागू नये म्हणून दोन्ही पावले वेगवेगळ्या कपड्यांत गुंडाळून ठेवावीत. जुने पायमोजेही वापरू शकतो. सकाळी उठल्यावर पाय साबण लावून धुवावेत, म्हणजे पायाचे तूप निघून जाईल. पायाला लावण्यासाठी देशी गायीचे साजूक तूप उपलब्ध नसल्यास खोबरेल तेल लावावेे.

– वैद्या (सौ.) शर्वरी जोशी, वाळपई, गोवा.