विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !

वर्ष २०१६ मध्ये जपान देशातील योशीनोरी ओहसूमी यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचा विषय काय होता, तर ‘आठवड्यातून एकदा तरी उपवास करा !’ त्यांनी उपवास शरिरासाठी किती लाभदायक आहे, हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केले, पण भारतीय संस्कृतीत ते प्राचीन काळापासूनच उपवास करण्याची पद्धत आहे ! उपवास केल्याने शरीर काय करते ?

सौ. वैदेही कुलकर्णी

१. मृत पेशी बाहेर काढते.

२. ‘सेल्युलर घटक’ (डी ग्रेड) अणि रिसायकल करणे आवश्यक आहे, अशा क्रियांना नियंत्रित करते

३. सेल्युलर घटकांच्या नूतनीकरणासाठी ऊर्जा आणि इंधन पुरवते.

४. संसर्ग करणारे इंट्रा सेल्युलर बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट होतात.

५. खराब झालेली प्रथिने आणि ऑर्गेनेल्स (पेशीतील सूक्ष्म अवयव) काढते.

६. वरील सर्वांमुळे वृद्धत्वाची लक्षणे न्यून होतात.

७. कर्करोग होण्याची शक्यता न्यून होते.

एकादशी आणि चतुर्थी अमावास्या किंवा पौर्णिमा यांच्या आधी अन् नंतर ४ दिवस आल्याने त्या दिवशी वातावरणातील दाब अल्प असतो.

– सौ. वैदेही कुलकर्णी, योगशिक्षिका, मेडिकल योग थेरपिस्ट, न्युरोथेरपिस्ट, पुणे