श्रीरामामंदिराच्या नावावर न्यास स्थापन करून पैसे गोळा करणार्या संस्थांची चौकशी करण्याचीही केली मागणी
हरिद्वार (उत्तराखंड) – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास भगवान श्रीरामाच्या प्रत्येक पैशांसाठी उत्तरदायी आहे आणि जो कुणी दोषी आढळेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका विश्व हिंदु परिषदेने मांडली. येथे विश्व हिंदु परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची २ दिवसांची बैठक संपली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहिंपने म्हटले की, रामालय ट्रस्ट आणि श्रीरामजन्म मंदिर पुनर्निर्माण ट्रस्टसह श्रीराममंदिराच्या नावावर पैसे किंवा सोने गोळा करणार्या इतर संस्थांच्या खात्यांचीही चौकशी झाली पाहिजे.
चौकशीपूर्वी कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे !
विहिंपने म्हटले की, श्रीराममंदिराच्या दान चोरीची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षावर पोचणे योग्य ठरणार नाही. कुणाची भूमिका जाणूनबुजून केलेल्या गैरव्यवहाराची आहे आणि कुणाची केवळ निष्काळजीपणाची आहे, हेही पाहिले पाहिजे. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या व्यवस्था पूर्णपणे दोषमुक्त आणि पारदर्शक केल्या पाहिजेत. काही राजकीय पक्ष अयोध्या आणि श्रीराममंदिर यांच्या सूत्राला वर्ष २०२७ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
विहिंपने सर्वपक्षीय समितीकडून चौकशी करण्याची मागणीही फेटाळून लावत म्हटले आहे की, गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे सोपवता येणार नाही.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक