(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

तेहरान (इराण) – इराणमध्ये एका गायिकेला हिजाबखेरीज गाणे सादर केल्यावरून ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. या जोडीला २ वर्षे इराण सोडण्यावर बंदी घालण्यासह २ वर्षे संगीत कार्यक्रम सादर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
Iranian singer Parastu Ahmadi (29) has been sentenced to 74 lashes for performing a song without wearing a hijab.
Where are the self-proclaimed women's rights activists who campaigned relentlessly over women's entry into Sabarimala? Why the silence now?
Is their concern truly… pic.twitter.com/08uTUxzAgh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
२९ वर्षीय परस्तू अहमदी असे या गायिकेचे नाव आहे. एका ‘लाईव्हस्ट्रीम परफॉर्मन्स’(ऑनलाईन सादरीकरण) कार्यक्रमात तिने हिजाब घातला नसल्याने तिला ही शिक्षा देण्यात आली. इराणच्या एका न्यायालयाने या संगीत कार्यक्रमाशी संबंधित निर्मिती पथकाच्या ८ सदस्यांनाही या प्रकरणात दोषी ठरवले. यामध्ये संगीतकारांचाही समावेश आहे. जगभरातील मानवाधिकार गट आणि कलाकार यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
१. हे प्रकरण डिसेंबर २०२४ मधील एका संगीत कार्यक्रमाशी संबंधित आहे. या कार्यक्रमात अहमदीने हिजाब न घालता एक देशभक्तीपर गीत गायले होते. हा संगीत कार्यक्रम तिच्या यू ट्युब चॅनलद्वारे प्रसारित झाला होता. कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर अहमदी आणि अनेक संगीतकार यांना कह्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
२. इराणी गायिकेला शिक्षा देण्याच्या निर्णयावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर ह्युमन राईट्स इन इराण’च्या संचालिका बहार गंदेहारी म्हणाल्या की, अशी शिक्षा या गोष्टीची आठवण करून देते की, इराणमधील मानवाधिकाराच्या स्थितीत कोणताही पालट झालेला नाही.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या