अनुमतीविना पुतळा बसवण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील नेरेडमेट भागात १८ जूनच्या मध्यरात्री महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याची कारवाई केली. प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा पुतळा आवश्यक अनुमतीविना बसवण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने पुतळा हटवून दुसर्या जागी नेण्यात आला. स्थानिक लोक आणि समर्थक यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे मध्यरात्री कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कारवाई केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अन् प्रशासनाने आधी संवादाचा मार्ग अवलंबायला हवा होता.
🚨 Chhatrapati Shivaji Maharaj’s Statue Removed at Midnight in Congress ruled Telangana! 🚨
In Neredmet, GHMC officials removed a statue of Chhatrapati Shivaji Maharaj during the night, citing lack of permission for its installation.
The question is: Does the administration… pic.twitter.com/wpRjFVoWVs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
या कारवाईच्या वेळी काही लोकांनी पुतळा हटवण्यास विरोध केला आणि घटनास्थळी जमा होऊन कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत काही लोकांना कह्यात घेतले. काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते. सध्या नेरेडमेटमधील परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे सांगितले जात आहे; परंतु या कारवाईविषयी स्थानिक पातळीवर असंतोष आहे.
प्रशासनाने सांगितले की, पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला असून पुढील कारवाई कायद्यानुसार केली जाईल.
जानेवारीमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता !
ही घटना नवीन नाही. जानेवारी २०२६ मध्येही नेरेडमेटच्या विनायक नगर भागात अनुमतीविना उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत पोलिसांनी कारवाई केल्याने वाद निर्माण झाला होता.

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक