संपादकीय : शिरच्छेदाची शिकवण शाळेत ?

महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या राजकारणाच्या चर्चा चवीने पाहिल्या जात असतांना जालना येथील शाळेत मुलांनी केलेल्या अथवा त्यांच्याकडून करून घेतलेल्या हिंसक आणि आतंकवादाचे समर्थन करणार्‍या नृत्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. ते झाल्यास शाळांचे रूपांतर ‘हिंसा शिकवणारी आतंकवादी केंद्रे’ झाल्याचे पहायला मिळेल. जालना येथील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’ या शाळेत हातात तलवारी मिरवत ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ या गाण्यावर शाळेतील मुलांनी नाच केला. या वेळी मंचाच्या मागच्या पडद्यावर पाकिस्तानी आतंकवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र झळकत होते. घटना पाकिस्तानातील नाही, भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील आहे. जिहादी आतंकवाद गावात येऊन ठेपल्याचे संकेत मिळेपर्यंत तो शाळांमध्ये जाणार्‍या मुलांनाही शिकवला जाऊ लागला आहे, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

उदयपूरमध्ये महंमद रियाझ आणि गौज महंमद यांनी कन्हैय्यालाल यांची हत्या जे भयानक वाक्य म्हणत केली, ज्या घटनेचा व्हिडिओ पाहून उभा देश भयाने थक्क झाला, त्याच ओळी मुलांच्या तोंडी हातात तलवारीसह आलेल्या आहेत ! म्हणजे ‘जिहादी आतंकवादाचे बीज घरोघरी पेरले जात आहे’, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आजही ज्या देशातील सामान्य नागरिक गणवेशातील कायद्याकडे पहातांना आदरयुक्त भीती बाळगतो, त्या देशात ईशनिंदेची शिक्षा म्हणून थेट ‘सर तन से जुदा’ ही शिकवण मुलांना देऊन त्यांना उद्याचे महंमद रियाझ आणि गौज महंमद बनवण्याचे शिक्षण कोण देत आहे ? मुलांना भविष्यात हत्या करण्यासाठी कोण सिद्ध करत आहे ? आणि का करत आहे ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार यांनी शोधून काढलेच पाहिजे.

मदरसे नाही, आता इस्लामी विचार शाळा !

या प्रकरणी मुसलमान मुख्याध्यापक वझिरुद्दीन महंमद तारिक सिद्दीकी, शिक्षक तारिक अब्दुल गनी, संचालक उस्मान यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक केली गेली आहे. ज्या शाळेतील ही घटना आहे, त्या शाळेची माहिती देणारे ‘इन्स्टाग्राम’ खाते बंद असले, तरी ‘सी.बी.एस्.सी. पॅटर्न इंग्लिश स्कूल ऑफ इस्लामिक थॉट्स’ अशी या शाळेची जुनी ओळख इंटरनेटवर अद्यापही दिसत आहे. इस्लामी विचारांच्या अधीन असलेल्या शाळा मदरशांसारख्याच असतात, अशी शितावरून भाताची परीक्षा केल्यास देशात इस्लामी विचारसरणीच्या अशा कितीतरी शाळा चालतात, हे आपल्या लक्षात येईल. त्यांची आकडेवारी आणि प्रत्येक शाळेत हेच शिकवले जाण्याची शक्यता अधिक असल्याने अशा सर्व शाळा सरकारच्या ‘रडार’वर असल्या पाहिजेत. सरकार अथवा प्रशासन शाळांची नोंदणी करून नंतर ‘तेथे काय शिकवले जात आहे ?’, याकडे पहात नाही, हेही या घटनेतून समोर येते.

आतापर्यंत मदरशांमधून कट्टरतेचे शिक्षण दिले जात असल्याचे सर्वांनी पाहिले आणि ऐकले आहे. मदरसे आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असल्याच्या घटना समोर आल्यानंतर देशात काही ठिकाणी मदरशांवर कारवाई झाली आणि आतंकवाद्यांना कार्य करणे अवघड झाले; म्हणूनच आता नाव पालटून आणि सरकारी अभ्यासक्रमाच्या आडून कट्टरतेचे शिक्षण चालू ठेवण्याची अशी नवी मेख जिहादी आतंकवाद्यांनी शोधून काढली आहे. न जाणो असे आणखी किती आणि कोणते प्रकार देशाला अन् हिंदूंना खिळखिळे करण्यासाठी चालू आहेत ?

नुकताच हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी जालना येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींनी बुरखा घालून ‘मै परदा करती हूं’ या गाण्यावर नाच केल्याचा व्हिडिओ प्रसारित केला. सरकारी शाळांमध्ये गीता शिकवली जाऊ नये, यासाठी रान उठवणार्‍या निधर्मीवाद्यांनी, कथित सर्वधर्मसमभाव प्रेमींनी यावर मौन बाळगले, यात शंका नाही; पण सरकारी शाळांमध्ये मुलींनी काळे बुरखे घालून बुरख्याची प्रशंसा करायला हा काही पाकिस्तान आहे का ? हा प्रश्न तरी सरकारने, प्रशासनाने विचारला का ?

‘आजच्या मुलांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत ? त्यावर देशाचे भवितव्य ठरते’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य सुसंस्कृत भारतीय हिंदूंनी नाही, तर जिहाद्यांनी कृतीत आणले आहे. त्यासाठीच ते लहानपणीच मुलांमध्ये धर्मांधता, कट्टर जिहादी विचारसरणी रूजवत आहेत. हा प्रकार असाच चालू राहिला, तर ‘पेराल, ते उगवेल’ याप्रमाणे ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देणार्‍या आतंकवाद्यांचे रानच देशात उगवेल. देहलीतील लाल किल्ल्याजवळ बाँबस्फोट करणारे आतंकवादी उच्चशिक्षित; परंतु जिहादी विचारसरणीचे होते, हे विसरता कामा नये. त्यांना धर्मांधता आणि कट्टरता यांची शिकवण लहानपणापासूनच दिली जाण्याची शक्यता असल्याने आतंकवादी आक्रमण करण्याचे त्यांचे धाडस झाले. जिहादी आतंकवाद्यांचे भारताला ‘दारूल-ए-इस्लाम’ बनवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नसेल, तर जालना येथील प्रकाराला मोठा विरोध होणे आणि  देशभरातील प्रत्येक इस्लामी विचारसरणीशी निगडित केंद्राची चौकशी होईंपर्यंत तो चालू ठेवणे, आवश्यक आहे.

निजामशाहीची मुळे उखडून टाका !

आज पक्षांची जोड-तोड होत असतांना मुलांच्या माध्यमातून भविष्यातील भारताची फाळणी होण्याची शक्यता आहे आणि जर देश तुटला, तर जगण्याची मारामार होणार असल्याने पक्षांचे अस्तित्वच रहाणार नाही, हे पक्षीय राजकारणात अडकलेल्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे ‘राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाकडे अधिक लक्ष द्यावे’, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.

रझाकारांना जन्म दिलेल्या निजामशाहीने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. त्यानंतर जे झाले, ते मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. स्वतंत्र भारतात विलीनीकरणानंतरही आज जालना येथे जो प्रकार घडला, त्यातून निजामशाहीची पाळेमुळे तेथे आजही जिवंत असल्याचे लक्षात येते. रझाकारांनी केलेला विध्वंस भारतीय इतिहासाला ज्ञात आहे, तो भविष्यातील भारताला भोगावा लागू नये, यासाठी सरकारनेच कंबर कसली पाहिजे. या पूर्ण प्रकरणामध्ये सरकारची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. अशी जिहादी विचारसरणी कुठल्या शाळांमध्ये प्रसारित केली जात आहे, हे लक्षात घेऊन सरकारने अशांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. अन्यथा भारताचे भविष्य पुन्हा निजामशाहीच्या दिशेने लोटले न जाण्यासाठी हिंदू स्वतःच कंबर कसतील, हे नक्की !

शाळांमध्ये कट्टरता, धर्मांधता यांची बिजे पेरली जाणे, ही राष्ट्राच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा !