‘१५.२.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘साधकांनो, काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करा !’, असा संदेश प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून मी हा नामजप करत आहे. हा नामजप करत असतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. आरंभी काही काळ मला हा नामजप श्वासासह करणे कठीण जात होते. नंतर काही कालावधीने माझा श्वासासह नामजप होऊ लागला.
२. नंतर एक दिवसाने ‘हा नामजप करत असतांना माझ्या दोन्ही नाड्या (सूर्यनाडी आणि चंद्रनाडी) चालू असून सुषुम्ना नाडीही उघडली आहे’, असे मला जाणवू लागले.

३. ‘शरिरात चैतन्याचा एक प्रवाह वहात असून प्रत्येक पेशी नाम घेत आहे’, असे मला अधूनमधून जाणवत आहे. त्या वेळी ‘माझे नाम शब्दाच्या पलीकडे चालू असून माझे लक्ष केवळ श्वासावर केंद्रित होत आहे. तेव्हा केवळ ‘नाम आणि मी’, असे होऊन ‘काही न करता केवळ तो आनंद अनुभवावा’, असे मला वाटले. त्या वेळी मला अधूनमधून मनाची निर्विचार अवस्था अनुभवायला मिळाली.‘या स्थितीतून बाहेर पडू नये’, असे मला वाटले.
४. मी नामजप करत असतांना ‘माझ्या पायाच्या वरील बाजूने सतत काहीतरी बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.
५. आता माझे नामस्मरण शब्दांमध्ये होत नसून ‘केवळ नामजपाची स्पंदने अनुभवणे’, असे होत आहे. ‘माझा मधूनच ‘सोऽहम्’ असा नामजप चालू होऊन मी सूक्ष्म धाग्याने ईश्वराशी जोडला गेलो आहे’, असे मला जाणवते आणि काही वेळाने माझे केवळ श्वासावरच लक्ष केंद्रित होते अन् मन शांत होते.
या अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ७० वर्षे), पुणे (२३.२.२०२६)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद