
१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाची ओढ वाटणारे पिंगुळी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील श्री. लक्ष्मण दत्ताराम मसुरकर (वय ७४ वर्षे) !
१ अ. आरंभी श्री. मसुरकर यांचा कुटुंबियांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्यास विरोध असणे : ‘श्री. लक्ष्मण दत्ताराम मसुरकर यांच्या घरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर आरंभी ते दैनिक हातातही घेत नव्हते. ते कुटुंबियांना विरोध करत असत. त्यांची पत्नी, सून आणि मुलगा सर्व जण दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असत; मात्र काका वाचन करत नसत.
१ आ. श्री. मसुरकर यांच्या पत्नीने श्री. मसुरकर रुग्णाईत असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील चैतन्याने त्यांची प्रकृती सुधारणे, त्यांना ‘सनातन प्रभात’च्या वाचनाची गोडी लागणे आणि त्यांच्यातील पालट पाहून त्यांचे कुटुंबीय ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडले जाणे : नंतर काका रुग्णाईत असतांना त्यांच्या पत्नीने दैनिक ‘सनातन प्रभात’ काकांच्या शरिराजवळ ठेवायला आरंभ केला. त्यानंतर त्यातील चैतन्यामुळे काकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. तेव्हापासून काकांना दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती कृतज्ञता वाटू लागली. ते प्रत्येक रविवारी दैनिक आल्यावर हातात घ्यायला लागले. त्यांनी हळूहळू दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला आरंभ केला. त्यांना दैनिक पुष्कळ आवडू लागले. काकांमध्ये हा सकारात्मक पालट झाला. त्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा आणि सून ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडू शकले.
१ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे झालेले सकारात्मक पालट : आता ‘काका रविवारी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ कधी येणार ?’, याची वाट पहात असतात. त्यांची दैनिक वाचनाची ओढ वाढली आहे. त्यांच्यात ‘दैनिकाचे पूर्ण वाचन करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ने आवरण काढणे, वाचून झाल्यावर दैनिकाची व्यवस्थित घडी घालून ठेवणे, पत्नी आणि सून यांना सत्संगाला जाण्यासाठी अनुमती देणे’, असे सकारात्मक पालट केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे घडून आले.
१ ई. आता काकांच्या चेहर्यावर तेज दिसते. त्यांचा चेहरा लहान बालकाप्रमाणे निरागस आणि आनंदी दिसतो.’
२. पिंगुळी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील चव्हाण कुटुंबियांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने नामजप करायला आरंभ करून ते स्थिर रहाणे
२ अ. कै. गोपाळ चव्हाण यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे आणि कर्करोग होऊनही ते स्थिर असणे : ‘कै. गोपाळ चव्हाण यांनी घरी रविवारचे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केले. तेव्हापासून त्यांनी ‘ श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास आरंभ केला. त्यांना कर्करोग झाला होता, तरीही ते स्थिर होते.
२ आ. श्रीमती चव्हाणकाकूंनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार प्रतिदिन नामजप करणे आणि सनातन संस्थेच्या कार्यक्रमांना उपस्थित रहाणे : कै. चव्हाण यांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी ‘श्रीमती रुक्मिणी चव्हाण पुष्कळ स्थिर आहेत’, असे लक्षात आले. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’चे पूर्ण वाचन करतात. त्या इतर संप्रदायानुसार साधना करतात. त्या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार प्रतिदिन ‘दत्तगुरु’ आणि ‘कुलदेवता’ यांचा नामजप करतात. त्या सनातन संस्थेच्या कार्यक्रमांना उपस्थित रहातात.’
– सौ. अश्विनी अनिल गावडे, पिंगुळी, सिंधुदुर्ग. (१०.४.२०२६)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !