
जेणें जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरें गुण गातो ॥
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें ।
परी अंतरी नामविश्वास तेथें ॥
ज्याने कामाला (वासनेला) जाळून भस्म केले; अत्यंत प्रबल, थोर तपस्वी यांनाही अजिंक्य असलेला मदन; मी मी म्हणणार्या थोर ज्यांच्या नुसत्या नेत्रकटाक्षाने जळून गेला, ज्यांना कशाचीही आशा आकांक्षा उरली नाही, कोणत्याही ऐहिक आणि पारलौकिक स्वरूपाचा मोह ज्यांच्या ठिकाणी संभवत नाही, ते भगवान शंकरही रामाचे ध्यान करतात. त्यांनाही रामनामाची ओढ आहे. ते त्यांना जीवाभावाने प्रिय आहे. आपल्या प्रिय पत्नीला, म्हणजेच पार्वतीला त्यांनी रामाचे श्रेष्ठत्व आणि रामनामाचे महत्त्व अनेक वेळा अन् अनेक प्रकारांनी गौरवून सांगितले आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !