कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको येथे चालू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील घटना
‘मेइवाकू’ संस्कृतीमुळे जपानी प्रेक्षकांचे जगभर कौतुक

डॅलस (अमेरिका) – सामाजिक दायित्वाचे भान आणि कर्तव्यदक्षता यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानी नागरिकांच्या शिस्तप्रियतेचा अनुभव संपूर्ण जगाने पुन्हा एकदा नुकताच घेतला. सध्या कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको येथे चालू असलेल्या ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत डॅलस येथे नेदरलँड्सविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर जपानी प्रेक्षकांनी ‘स्टेडियम’मध्ये (प्रेक्षक बसतात त्या भागात) पडलेला कचरा स्वतः उचलून परिसर स्वच्छ केला. त्यांच्या या कृतीचे जगभरातून कौतुक होत आहे.
जपानी संस्कृतीत एखादे ठिकाण जसे आढळले, तसे सोडून जाण्याविषयी तत्त्वज्ञान सांगितले आहे. हे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत शिकवले जाते. या शिकवणुकीनुसार सामना संपल्यानंतरही प्रेक्षक स्टेडियममधील कचरा उचलण्यासाठी थांबले. त्यांनी कचरा वेचण्यास आरंभ करताच त्यांना अन्य उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून मानवंदना दिली.
🇯🇵Japanese Fans Clean the Stadium After the #FIFAWorldCup Match!
Japanese spectators stayed behind to pick up trash and clean the stadium area themselves. 👏✨
This inspiring incident comes from the ongoing Football World Cup hosted across 🇨🇦 Canada, 🇺🇸 USA, and 🇲🇽 Mexico.… pic.twitter.com/GTfijEFoF1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
‘मेइवाकू’ म्हणजे नेमके काय ?
जपानी संस्कृतीत ‘मेइवाकू’ ही महत्त्वाची संकल्पना आहे. याचा अर्थ इतरांची गैरसोय होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे. सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ ठेवणे किंवा इतरांसाठी अतिरिक्त काम निर्माण करणे, हे ‘मेइवाकू’च्या तत्त्वांच्या विरुद्ध मानले जाते. याविषयी एका जपानी तरुणीला विचारले असता तिने सांगितले, ‘‘हा आमच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. आमचे स्वागत करणार्या यजमान देशाप्रती आणि आमच्या खेळाडूंप्रती आदर व्यक्त करण्याचाही हा एक मार्ग आहे. येथे येणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व काही अस्ताव्यस्त अवस्थेत सोडून जाणे आम्हाला योग्य वाटत नाही.’’
यापूर्वीही दाखवली आहे शिस्तप्रियता !
वर्ष २०२२ मध्ये कतारमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एका सामन्यानंतर जपानी नागरिकांनी तेथील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम अशाच प्रकारे स्वच्छ करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे त्या वेळी कतार आणि इक्वेडोर यांच्यात सामना झाला होता. जपानचा संघ खेळला नसतांनाही जपानी नागरिकांनी मैदानातील कचरा उचलला होता. वर्ष २०१८ मध्ये रशियात, तर वर्ष २०१४ मध्ये ब्राझिलमध्ये झालेल्या स्पर्धांमध्येही जपानी नागरिकांनी शिस्तप्रियता दाखवली होती.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !