‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान’चा निर्णय

देहूगाव (पुणे) – जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा आणि चौघडागाडीचा मान यंदा ‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान’च्या वतीने खरेदी केलेल्या बैलजोड्यांना देण्यात येणार असल्याची माहिती ‘पालखी सोहळा प्रमुख’ विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली. मोरे महाराज म्हणाले, ‘‘यंदाही पालखी रथासाठी २ बैलजोड्या आणि चौघडा गाडीसाठी १ अशा खिलार जातीच्या देखण्या, तंदुरुस्त अन् सक्षम ३ बैलजोड्या खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही बैलजोड्या जुंपण्याचा प्रश्न येत नाही.’’
सातारा जिल्ह्यातील बावधन गाव परिसर आणि कर्नाटक राज्यात या बैलजोड्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी परिसरातील शेतकर्यांच्या बैलजोड्यांना संधी देण्यात आली होती. ‘संस्थानने घेतलेल्या निर्णयाला परिसरातील शेतकर्यांनी साहाय्य करावे’, असेही आवाहन मोरे यांनी केले. ‘देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते श्रीक्षेत्र देहू असा ३१ दिवसांचा पालखी प्रवास या बैलजोड्या करणार आहेत. पालखी सोहळा पूर्ण झाल्यानंतर इच्छुक शेतकर्यांकडून मागणी आल्यास बैलजोड्यांची विक्री केली जाणार आहे’, असेही मोरे महाराज यांनी सांगितले.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !