‘अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना त्याअंतर्गत वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात, उदा. गुढीपाडवा मोहीम, रामनवमीची मोहीम इत्यादी. ‘साधकाचे शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी होऊन जलद आध्यात्मिक प्रगती होणे अन् प्रत्येक मोहिमेच्या माध्यमातून व्यष्टी आणि समष्टी यांमध्ये रामराज्य आणणे’, हा व्यापक उद्देश ठेवून मोहिमा किंवा उपक्रम राबवणे गुरुदेवांना अपेक्षित आहे. साधकांनी मोहिमा पुढीलप्रमाणे राबवल्या, तर त्यांची साधना होऊन त्यांच्यावर गुरुकृपा होईल.

१. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे ‘हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा !’, असा भाव साधकांनी ठेवायला हवा. जशी शिवरायांची समर्थ रामदासस्वामींवर श्रद्धा होती, तशी गुरुतत्त्वावर आपली श्रद्धा हवी. संत, सद्गुरु, दायित्व असलेले साधक, सहसाधक आणि समाज यांच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते. साधकांची साधना गुरूंना अपेक्षित अशी असेल, तर साधक गुरुतत्त्व ग्रहण करू शकतात.
२. ‘ध्येयप्राप्तीसाठी बाजीप्रभु देशपांडे यांच्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत खंबीरपणे लढायचे आहे’, असा निर्धार मोहीम राबवतांना हवा. याचा भावार्थ असा की, सर्व संकटांवर कष्टाने मात करून ध्येयाप्रती अढळ रहावे.

३. तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणे वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून ‘हिंदु राष्ट्रा’च्या कार्याला प्राधान्य द्यायला हवे. नातेसंबंध साधना म्हणून सांभाळावेत; पण लक्ष गुरुसेवेवर असावे.
४. शिवा काशीदप्रमाणे स्वतःला सेवेसाठी तन-मन-धनाने देवाच्या चरणी संपूर्णपणे समर्पित होता आले पाहिजे. स्वतःतील स्वभावदोष आणि अहं नष्ट करून स्वतःला शुद्ध अंतःकरणाने सेवेसाठी समर्पित करावे.
५. शिवरायांचे मावळे जसे शत्रूंवर तुटून पडून त्यांना संपवायचे, तसे साधकांनी सतत जागरूक राहून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्यावर तुटून पडून चित्तशुद्धी करून घ्यावी.
प्रत्येक मोहीम ही शिवरायांच्या मोहिमेप्रमाणे दायित्व घेऊन केली, तर साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना पावनखिंडीप्रमाणे अजरामर होऊन साधक गुरुकृपा अनुभवू शकतील.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (४.४.२०२६)
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !