श्री. गोपीचंद व्हनमारे, सोलापूर

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील छत्रपती संभाजी महाराज (जुने) बसस्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. प्रशस्त बसस्थानक, आधुनिक प्रकाशदिवे, पिण्याच्या पाण्याची, तसेच प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था, नवीन फरशी, बसण्यासाठी मार्बलचे कठडे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु प्रवासी करत असलेल्या अस्वच्छतेमुळे आणि येथे नियमित स्वच्छता केली जात नसल्याने नूतनीकरणाला गालबोट लागले आहे.

१. बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’ (वाहने उभी करू नका) असा फलक असूनही तेथे दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. ‘नियमभंग केल्यास दंड आकारला जाईल’, असे फलक असतांनाही संबंधित वाहनांवर कारवाई होतांना दिसत नाही.



२. ठिकठिकाणी पानमसाल्याच्या पिचकार्या मारण्यात आल्याने प्रवाशांना उभे रहावे लागते.

३. परिसरात एक जलशीतकरण यंत्र असून तेही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना नळाचे पाणी प्यावे लागते. पिण्याच्या पाण्याच्या अडचणीमुळे बाहेरील विक्रेते प्रवाशांना १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना विकत आहेत; मात्र बसस्थानकातील अधिकारी त्यांना विरोध करत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. याविषयी आगारप्रमुखांना सांगितल्यावर त्यांनी ‘आम्ही कारवाई करतो’, असे मुळमुळीत उत्तर दिले; पण तशी कारवाई झाल्याचे आढळले नाही.

४. नियंत्रण कक्ष बंद अवस्थेत आहे.
बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा ! हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !नागरिकांना आवाहन !‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे. सूचना नोंदवा !वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा ! |
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले