सर्वांना सामावून घेणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !

भारतात एकत्र कुटुंबपद्धत होती. अजूनही काही ठिकाणी ती आहे. मोठमोठी घरे. बाजूला ऐसपैस बागबगीचा आगर, जवळच ५-५० गुरांचा गोठा. कामाला ४ गडी, मोलकरणी. घरात वृद्ध आई-वडिलांसह राहणारे ४-५ पुत्र आणि त्यांचे परिवार, अशी ५-२५ मंडळी एकत्र, एकाच ठिकाणी रहात. त्यांतच एखादा अविवाहित काका, एखादी अविवाहित किंवा विधवा आत्या. एखादा अशक्त किंवा अपंग किंवा रुग्ण असलेला भाऊ किंवा बहीण. सर्व भावांच्या मुलांपैकी एखादे अपंग किंवा मतीमंद अपत्य. असा मोठा रामरगाडा असायचा; पण सगळी मंडळी एकमेकांचा आदर करून आणि मर्यादा सांभाळून वागायची. कधी भांड्याला भांडे लागायचे; पण त्यातून वैर निर्माण व्हायचे नाही. अशा कुटुंबात अनुत्पादक व्यक्तीलाही स्थान होते.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

प्रत्येक माणूस जन्मभर कमावणारा नसतो. कित्येक माणसे कधीच कमावती नसतात; पण म्हणून काही ती कुटुंबाबाहेर फेकली जात नसत. त्यांनासुद्धा घरात सन्मान्य वागणूक मिळायची. माझ्या माहितीतील एका कुटुंबात एक पांगळी मुलगी आहे. आता ती साठीची असेल. ती स्वतः उभी सुद्धा राहू शकत नाही, तरी सर्व आनंदी आहेत. एका घरात एक मतीमंद मुलगा होता; पण एकत्र कुटुंबामुळे तो कुणाला ओझे वाटत नव्हता.

– भारताचार्य पू. (प्रा.) सुरेश गजानन शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)