
१. ऋषिमुनींनी दाढी वाढवल्यामुळे सध्याच्या तरुणांनीही दाढी वाढवणे
‘सध्या अनेक तरुण मुले दाढी वाढवतांना दिसतात. खरेतर तरुणांनी दाढी वाढवायला नको. एका तरुणाने मला विचारले, ‘‘दाढी का वाढवायची नाही ? पूर्वी ऋषिमुनींनी दाढी वाढवलेलीच होती ना !’’ मी त्याला म्हणाले, ‘‘तुम्ही ऋषिमुनींनी दाढी वाढवलेली पहाता; पण त्यांनी केलेली साधना करता का ? त्यांच्याप्रमाणे केवळ दाढी वाढवता; पण कोणतीही साधना करत नाही. साधना केल्यामुळे दाढीमुळे निर्माण होणारा मनुष्यावरील रज-तमाचा प्रभाव नष्ट होतो. साधनेमुळे पंचमहाभूतांवरही अधिकार येतो.’’
२. समाजातील तरुणींनी ‘दुर्गादेवीने केस मोकळे सोडलेले असतात’, असे म्हणून स्वतःचे केसही मोकळे सोडणे
समाजातील अनेक मुली केस मोकळे सोडून फिरतांना दिसतात. आपण त्यांना ‘केस मोकळे सोडू नका’, असे सांगितल्यास त्या लगेच म्हणतात की, ‘दुर्गादेवीनेही केस मोकळेच सोडलेले असतात ना ?’ दुर्गादेवी केस कधी मोकळे सोडते, तर जेव्हा रणकंदन चालू होते तेव्हा ! दुर्गादेवीतील तमोगुण कार्यरत होतो. तेव्हा ती ‘रणचंडी’ बनते आणि स्वतःचे केस मोकळे सोडते ! हे रणचंडीचे रूप तिचे मारक तत्त्व असते.’’ साधकांना अशा प्रकारे सगळी उत्तरे ठाऊक असायला हवीत, म्हणजे योग्य त्या ठिकाणी आपण त्याविषयीचे धर्मशिक्षण देऊन ‘हिंदु धर्म आणि योग्य मार्गाने केलेली साधना’ यांवरील त्यांची श्रद्धा दृढ करू शकतो !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (२१.९.२०२५)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !