
‘श्रीसत्शक्ति ’ आणि ‘श्रीचित्शक्ति’ ही ब्रह्मांडातील शक्ती आहे. तो देह नाही. ती निर्गुणातील शक्ती आहे. त्या शक्तीला आम्हीही नमस्कार करतो. तो आमचा भाव आहे. ‘ती शक्ती आम्ही आहोत’, असे नाही. तशी आम्हाला जाणीवही नसते; म्हणून तर त्या पदव्या आम्हाला दिल्या आहेत, नाहीतर त्यातूनच आमचा अहं वाढला असता आणि आमची घसरण झाली असती. जेव्हा ‘घसरण होणार नाही’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मनात येते, तेव्हाच ती पदवी दिली जाते. ‘श्रीसत्शक्ति, चित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म आहे. या शब्दांमध्ये पुष्कळ शक्ती आहे. ते शब्द उच्चारल्यावर त्यातून चैतन्य आणि तत्त्व मिळते. त्या शब्दब्रह्माला आमचा नमस्कार आहे. आपल्याला त्या स्तरापर्यंत जायचे आहे. तो देह नाही, तर ते तत्त्व आहे. ते प्रकाशमान ब्रह्म आहे आणि कुठेतरी ते विराजमान आहे.
आम्हाला कुणी ‘श्रीसत्शक्ति ’ आणि ‘श्रीचित्शक्ति’ म्हणावे’, अशी आमची अपेक्षा नसते. कोणताही शब्द उच्चारला की, त्याच्यासमवेत त्याची शक्ती येते. म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ या एकत्र असतात. ‘श्रीसत्शक्ति’ म्हटल्यावर त्या शब्दांतील चैतन्य लगेच आपल्या शरिरामध्ये प्रवेश करत असते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (२१.९.२०२५)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !