महंमदने पीडितेशी संबंध प्रस्थापित केल्याने पीडिता होती ३ महिन्यांची गर्भवती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे परिचारिका होण्याचे शिक्षण घेणार्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा नुकताच मृत्यू झाला. धर्मांध अन्वेषणातून तिचा गर्भपाताच्या बर्याच गोळ्या घेतल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. ती ३ महिन्यांची गर्भवती होती आणि तिचा प्रियकर महंमद समीर याने तिला त्या गोळ्या घेण्यास बाध्य केले होते. या प्रकरणी समीरला अटक करण्यात आली आहे.
१० जूनच्या सकाळी वसतीगृहाच्या पायर्यांवर विद्यार्थिनी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. विद्यार्थिनीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अन्वेषणाच्या वेळी असे समजले की, ती विद्यार्थिनी मिरगंज (जौनपूर) येथील करियाव गावचा रहिवासी असलेल्या महंमद समीर याला भेटण्यासाठी मुलांच्या वसतीगृहात वारंवार जात असे. पोलिसांनी समीरला त्याच्या घरातून अटक केली आहे.
समीरने गुन्ह्याची दिली स्वीकृती !
समीरने चौकशीत स्वीकारले की, ते दोघे गेल्या २ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. काही काळापूर्वी त्या विद्यार्थिनीने त्याला आपण गर्भवती असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला की, मी तिला औषध घेण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला. मी तिच्यावर दबाव आणला. तिने लग्नाचा प्रस्ताव मांडला असता मी त्याला सहमती दर्शवली नाही. शेवटी तिच्या इच्छेविरुद्ध मी तिला ते औषध घेण्यास भाग पाडले.
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !
ब्रिटन : युवतीवर बलात्कार करणार्या पाकिस्तानी नागरिक शेराज मलिकला १० वर्षांची शिक्षा !
Mahalakshmi Kolhapur Suvarna Kalash : श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवला !
कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार