उच्च न्यायालयाचे व्हिडिओ हटवण्याचे आदेश !

मुंबई – अभिनेते सलमान खान यांनी त्यांच्या पनवेल येथील ‘फार्म हाऊस’च्या (‘शेतातील घरा’च्या) बांधकामासाठी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप त्यांचे शेजारी केतन कक्कर यांनी केला. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही खान यांनी बंद केला, असे कक्कर यांचे म्हणणे आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकार्यांकडे तक्रार करूनही त्यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. (सलमान खान वलयांकित व्यक्ती असल्यामुळे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करू धजावत नाहीत, असेच यातून म्हटले पाहिजे. संबंधित अधिकार्यांवर कारवाई होणार का ? – संपादक)
Bombay High Court orders removal of video accusing Salman Khan of environmental violations.
Why do officials turn a blind eye to high-profile figures?
Will the authorities face action?
Also, a deafening silence from environmentalists right now.
#SalmanKhan #Environment… pic.twitter.com/lxRbOZYM1F
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
कक्कर यांनी कंटाळून स्वत:चा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांत प्रसारित केला. व्हिडिओतून अपकीर्ती होत असल्याचा आरोप करून खान यांनी प्रथम दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाने कक्कर यांना सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ काढून टाकण्याचा आदेश देण्यास नकार दिल्यावर खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
‘कक्कर यांच्या पोस्ट अपकीर्ती करणार्या आणि जातीय तेढ निर्माण करणार्या असून अनेकांनी त्या पाहिल्या अन् त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत’, असा दावा खान यांनी उच्च न्यायालयात केला होता. यावर न्यायालयाने म्हटले की, सामाजिक माध्यमांचा वापर सहज करता येतो, याचा अर्थ हा नाही की, कुणाविरुद्ध अवमानकारक व्हिडिओ बनवणे. यासंदर्भात न्यायालयाने कक्कर यांना व्हिडिओ काढून टाकण्यावर विचार करण्यास सांगितले. तसेच खान यांच्या विरोधात कायद्याने दिलेल्या मार्गांनी कारवाईसाठी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न विचारला. कक्कर यांनी यावर ‘अधिकार्यांशी संपर्क करूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केला’, असे म्हटले.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक