
अक्कलकोट – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेले ३ दिवसीय निवासी हिंदु धर्म-संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, अंबाजोगाई, कर्नाटक, इंदापूर, वालचंदनगर, बार्शी आदी भागांतील सुमारे १५० युवक-युवती या शिबिरात सहभागी झाले होते. शिबिराला अक्कलकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदिच्छा भेट देऊन युवकांशी संवाद साधला. ‘धर्मरक्षण हे प्रत्येक हिंदूचे दायित्व असून युवकांनी राष्ट्र आणि धर्मासाठी सज्ज व्हावे’, असे आवाहन त्यांनी केले, तसेच अशा उपक्रमांसाठी आवश्यक ते साहाय्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

शिबिरात धर्मशिक्षण, हिंदु धर्माची तत्त्वे, भारतीय संस्कृती, राष्ट्रनिष्ठा, व्यक्तीमत्त्व विकास, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि कुटुंबव्यवस्थेतील संस्कार यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सनातन संस्थेच्या पू. दीपाली मतकर यांची उपस्थिती लाभली होती. या वेळी आमदार कल्याणशेट्टी यांना विविध विषयांवरील निवेदनेही देण्यात आली. शिवराजेश्वर मंदिरास मिळणार्या अल्प शासकीय अनुदानाचा प्रश्न, तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सदना’च्या जतन-संवर्धनाचा विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. अक्कलकोट येथील अमोलराजे भोसले यांनी अन्नछत्रात महाप्रसादाची व्यवस्था करून १०० जणांसाठी तीन प्रशस्त हॉल, गाद्या, उशा आणि बेडशीट यांची विनामूल्य निवासव्यवस्था उपलब्ध करून दिली. श्री. श्रीधर पोतदार यांनी ४० जणांच्या निवासाची व्यवस्था केली. राजाराय मठाच्या व्यवस्थापनाने ३ दिवस १५० शिबिरार्थींसाठी न्याहारीची व्यवस्था केली. श्री. बालाजी कदम यांनी शिबिरासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. शिबिरातील शिस्त, सेवाभाव आणि सात्त्विक वातावरण पाहून त्यांनी सभागृहात सकारात्मक पालट जाणवत असल्याची भावना व्यक्त केली आणि भविष्यातही सभागृह वापरण्याचे आवाहन केले.
शिबिरात संपूर्ण काळात आनंद, शिस्त, संघभावना आणि सेवाभाव यांचे वातावरण अनुभवायला आले. शिबिर यशस्वीपणे पार पडल्याने उपस्थितांनी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !
विशेष न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांची केली निर्दोष मुक्तता !
आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनाला न गेलेले अखिलेश यादव म्हणत आहेत की, अयोध्येला रामनगरी बनवीन !
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार