वर्ष २०२२ मध्ये महंमद पैगंबर यांच्या संदर्भात कथित अपमानास्पद टिपणी केल्याचे प्रकरण

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि आमदार टी. राजा सिंह यांना विशेष न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मधील एका प्रकरणात निर्दोष मुक्त केले. मंहमद पैगंबर यांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. खासदार-आमदार यांसाठीच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. वर्ष २०२२ मध्ये ते ७७ दिवस कोठडीत होते.
राजा सिंह यांचे अधिवक्ता के. करुणा सागर यांनी सांगितले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे न्यायालयाने आमदाराची निर्दोष मुक्तता केली.
सत्याचा विजय ! – आमदार टी. राजा सिंह
गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे टी. राजा सिंह यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत याला ‘सत्याचा विजय’ म्हटले. त्यांनी आरोप केला की, तत्कालीन भारत राष्ट्र समिती सरकारने ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’च्या (ए.आय.एम्.आय.एम्.च्या) दबावाखाली माझ्या विरोधात कारवाई केली होती.
ते पुढे म्हणाले की, मी नेहमीच कायदा आणि राज्यघटना यांच्या चौकटीत राहून माझी बाजू मांडली. आज माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप न्यायालयात खोटे ठरले आहेत. हा सत्य, न्याय आणि कायदा यांचा विजय आहे.
घटनाक्रम समूजन घ्या !
ऑगस्ट २०२२ मध्ये आमदार टी. राजा सिंह यांच्या विरोधात ‘प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्या’अंतर्गत कारवाई केल्यानंतर २५ ऑगस्ट ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्यांना कारागृहात रहावे लागले होते. आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते. पुढे वर्ष २०२३ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने त्यांचे निलंबन मागे घेत त्यांना पुन्हा एकदा भाग्यनगर शहरातील गोशामहल मतदारसंघातून उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले. ते तेलंगाणा विधानसभेवर पुन्हा निवडूनही आले. गेल्या वर्षी पक्षाच्या तेलंगणा युनिटच्या प्रमुखपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अनुमती नाकारल्यावरून आमदार सिंह यांनी भाजपला त्यागपत्र दिले.
मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची उपाययोजना करणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री
आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनाला न गेलेले अखिलेश यादव म्हणत आहेत की, अयोध्येला रामनगरी बनवीन !
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !