आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनाला न गेलेले अखिलेश यादव म्हणत आहेत की, अयोध्येला रामनगरी बनवीन !

भाजपचे आमदार अनिल सिंह यांची अखिलेश यादव यांच्यावर टीका !

अखिलेश यादव

उन्नाव (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणत आहेत की,  त्यांचे सरकार आल्यावर अयोध्येला रामनगरी बनवीन. तथापि जो माणूस आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनासाठी गेला नाही, तो म्हणत ते रामनगरी बनवतील. अखिलेश यादव यांना श्रीराममंदिराच्या सूत्रावर बोलण्यास लाज वाटली पाहिजे. त्यांच्या कुटुंबातील लोकांवर केंद्रीय अन्वेषण विभागकडून अन्वेषण चालू आहे. एक काळ असा होता, जेव्हा अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांच्या सरकारने रामभक्तांवर गोळीबार केला होता आणि आज हे लोक रामनगरी बनवण्याच्या गोष्टी करत आहेत. अशा लोकांना उत्तर देण्याचे काम वर्ष २०२७ मधील उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीत जनता करेल, अशी टीका भाजपचे आमदार अनिल सिंह यांनी केली आहे.

भाजपचे आमदार अनिल सिंह

मंदिरात चोरी करणार्‍यांना कर्करोग (कॅन्सर) होईल !

आमदार अनिल सिंह यांनी श्रीराममंदिर दान चोरीच्या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मंदिरात चोरी करणार्‍यांना कर्करोग (कॅन्सर) होईल आणि त्यांना देवाघरूनच मृत्यूची शिक्षा मिळेल.