
ठाणे – अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३० वर्षीय धनेश्वर उपाख्य धुळेश्वर पुजीयालाल कलासुवा याला ठाणे येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार वर्ष २०२१ ते २०२२ या काळात घडला होता. कापूरबावडी पोलिसांनी जुलै २०२२ मध्ये गुन्हा नोंद केला होता. पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा अन् संमतीने संबंध ठेवल्याचा बचाव पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या संमतीला कायदेशीर मान्यता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची उपाययोजना करणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री
गिरी येथे मुसळधार पावसात बंधारे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल
कुडाळच्या आठवडा बाजारात स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मांडले दुकान !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या