हिंदु तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मुसलमान तरुणीला अटक करा !

मृत हिंदु तरुणाच्या कुटुंबियाची भेट घेतांना माजी आमदार श्री. नितीन शिंदे आणि कार्यकर्ते

सांगली, १ जुलै (वार्ता.) – येथील खणभागात रहाणार्‍या दुर्वांक शेवाळे या हिंदु युवकाने मुसलमान तरुणीच्या धर्मांतराच्या दबावाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या भ्रमणभाषमध्ये संबंिधत तरुणीने धर्मांतरासाठी आणि ५ वेळा नमाजपठण करण्यासाठी दबाव आणल्याचे संभाषण सापडले. यावरून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मुसलमान तरुणीला अटक करावी, अशी मागणी ‘हिंदु एकता आंदोलन’ संघटनेने केली आहे. सांगली शहर पोलीस मात्र या प्रकरणाचे अन्वेषण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेवाळे कुटुंबियांनी केला आहे. हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. ‘दोषी मुसलमान मुलीला तात्काळ अटक करून तिचा भ्रमणभाष संच जप्त करावा आणि तिला पाठीशी घालणार्‍यांना सहआरोपी करावे’, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. (धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता जाणा ! – संपादक)