विरोधकांकडून विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने !

श्रीराममंदिरातील चोरीचा निषेध

मुंबई, १ जुलै (वार्ता.) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील दानपेटीतील चोरीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ३० जून या दिवशी विधानभवन इमारतीच्या पायर्‍यांवर कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी निदर्शने केली. यामध्ये ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांचे आमदार होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पायर्‍यांवर भाजपच्या निषेधाचा फलक दाखवून निषेधाच्या घोषणा दिल्या.