
मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-एस्.टी. संगे तीर्थाटन’ या योजनेत खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः संमती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविकांना सुरक्षित, सुसूत्र आणि माफक खर्चात तीर्थयात्रेची सुविधा मिळणार असून भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे, तसेच महामंडळाच्या महसुलातही वाढ होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
नव्या धोरणानुसार निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, पथकर, वाहनतळ सुविधा आणि प्रवेश शुल्क आदी सुविधा खासगी संस्था पुरवतील, तर बससेवा अन् प्रवासभाड्याचे उत्पन्न एस्.टी.कडेच रहाणार आहे. पूरक सुविधांमधील उत्पन्नापैकी किमान १० टक्के भाग एस्.टी.ला देणे संबंधित संस्थांसाठी बंधनकारक असणार आहे. राज्यातील ६ प्रदेशांसाठी निविदा प्रक्रियेद्वारे ६ पर्यटन संस्थांची २ वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड केली जाणार आहे. या योजनेमुळे मराठी युवक-युवती यांच्यासाठी पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि उद्योजकता यांच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास परिवहनमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
९ वाहनांची तोडफोड करणार्या चौघांना अटक !
हिंदु तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मुसलमान तरुणीला अटक करा !
ग्रामपंचायत संगणक परिचालकांना नियमित मानधन ! – ग्रामविकासमंत्री
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ !
विरोधकांकडून विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने !
प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांवर उपाययोजना करत आहोत ! – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे