ढाका (बांगलादेश) येथे अज्ञातांनी हिंदु पुजार्‍याला पैशांसाठी अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकले

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – येथे सुभाष देऊरी या हिंदु विद्यार्थ्याला ओलीस ठेवून त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. सुभाष हा जगन्नाथ विद्यापिठात कायद्याचे शिक्षण घेत असून तो एका मंदिरात पुजारी म्हणूनही काम करतो. २९ जूनच्या रात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्याला पकडले आणि त्याच्याकडून पैसे वसूल केल्यानंतर त्याना रस्त्याच्या कडेला फेकून पोबारा केला.

‘बांगलादेश हिंदु बौद्ध ख्रिश्चन ऐक्य परिषदे’चे प्रवक्ते काजल देवनाथ म्हणाले की, ‘आम्ही याविषयी पूर्ण माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे केवळ लूटमारीचे प्रकरण आहे का ?, याचाही शोध घेत आहोत.’ सुभाष यांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य करण्यात आले कि नाही ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

हे अज्ञात कोण असणार ?, हे वेगळे सांगायला नको ! इस्लामी देशाiत अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात, तर भारतात अल्पसंख्यांक बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार करतात ! हे हिंदूंना लज्जास्पद !