‘अग्नि-६’ क्षेपणास्त्राची तब्बल ८ सहस्र ते १२ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता

बालासोर (ओडिशा) – चांदीपूर येथील ‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज’वर होणार्या संभाव्य ‘अग्नि-६’ क्षेपणास्त्राच्या चाचणीपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव चाचणीच्या ठिकाणापासून १ ते ३.५ किमी परिसरातील अनुमाने ११ सहस्र ४४२ नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. त्यांची व्यवस्था विविध निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. प्रशासनाने चाचणीस्थळाच्या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
🚀 Potential launch of India's Agni-6 missile from Chandipur ITR, Odisha.
As a precaution, over 11,000 residents have been evacuated from areas around Launch Complex-3 in Balasore district, with restrictions imposed within a 3.5 km radius.
Agni-6 is reportedly capable of… pic.twitter.com/FNsIVxd4hD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2026
चाचणी झाल्यानंतर आणि सुरक्षा संमती मिळाल्यानंतर नागरिकांना परतण्याची अनुमती दिली जाईल. ‘अग्नि-६’ चाचणीविषयीची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ‘फर्स्ट पोस्ट’ या वृत्तसंकेस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे. हे क्षेपणास्त्र ८ सहस्र ते १२ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकते.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय