
अमेरिकेच्या एका ‘सिटी कौन्सिल’मध्ये (नगर परिषदेमध्ये) एका चर्चेच्या वेळी नेहा सुरतान या भारतीय तरुणीने हिंदु धर्म आणि भारतीय समुदाय यांचे सामर्थ्य अत्यंत प्रभावीपणे जगासमोर मांडले आहे. नेहा सुरतान सभेसमोर भारताची बाजू मांडतांना म्हणाली, ‘‘आकडेवारीनुसार भारतीय समुदाय अधिक सुशिक्षित आहे, त्यांचे उत्पन्न अधिक आहे आणि त्यांच्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अल्प आहे. जर एखादा समुदाय सुरक्षित समाज, चांगल्या शाळा आणि भक्कम आर्थिक योगदानाशी जोडलेला असेल, तर कुणाला त्याची भीती का वाटावी ?’’
तिच्या या विधानांनी केवळ अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आणि विशेषतः जे हिंदू, तसेच भारत यांच्याकडे दूषित दृष्टीने पहातात, त्यांच्या डोळ्यांत अंजन घातले गेले आहे. तिने या वाक्यांमधून हिंदु संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव जगाला करून दिली आहे. विदेशात राहूनही आपला धर्म आणि संस्कृती यांची गौरवशाली बाजू इतक्या प्रखरतेने मांडणे, हे कौतुकास्पद आहे. नेहा सुरतानने मांडलेले हे विचार प्रत्येक भारतियासाठी अभिमानास्पद आहेत !

नेहाने सांगितले, ‘‘जगातील अनेक धर्म विस्तारवादावर विश्वास ठेवतात; मात्र हिंदु धर्म त्याची मते कुणावरही लादत नाही. आम्ही तुमचे सण (‘थँक्स गिव्हिंग’ आणि ‘ख्रिसमस’) साजरे करतो; पण आमचा धर्म कुणावरही थोपवत नाही. हिंदु धर्मात बळजोरीने धर्मांतर करण्याची कोणतीही परंपरा नाही, हेच या धर्माचे मोठेपण आहे.’’ आज भारतात राहून जे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) म्हणवून घेण्यात धन्यता मानतात आणि हिंदुत्वाचा न्यूनगंड बाळगतात, त्यांनी नेहा सुरतानकडून बोध घेण्याची आवश्यकता आहे. भारतात राहून कोट्यवधी रुपयांची कमाई करणार्या आणि बहुसंख्यांक हिंदूंच्या जिवावर मोठे झालेल्या कित्येक बॉलीवूड कलाकारांना ‘भारतात रहाणे सुरक्षित वाटत नाही’, अशी गरळ ओकण्याची सवय जडली आहे, त्यांनी नेहा सुरतानकडून शिकावे !
तमिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्म हा डेंग्यू, मलेरियासारखा असून तो नष्ट केला पाहिजे’, असे अत्यंत हिणकस वक्तव्य करून कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. मायभूमीतील अशा नेत्यांना परदेशातील या हिंदु तरुणीने तिच्या आचरणातून सणसणीत चपराक दिली आहे. सातासमुद्रापार राहून जर एक तरुण मुलगी हिंदु धर्माचा झेंडा विचारांच्या पातळीवर इतका उंच फडकवू शकते, तर मायभूमीत रहाणार्या हिंदूंना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटायलाच हवा. हिंदु धर्माची ही गौरवशाली आणि न्याय्य बाजू जागतिक स्तरावर अशाच प्रखरतेने मांडली गेली, तरच हिंदुद्वेष्ट्यांचे मनसुबे उधळून लावले जातील, यात शंका नाही !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !
‘कॉकरोच’ना ‘डायनासॉर’ म्हणून रंगवले, तरी देशात क्रांती होणे अशक्य !
आदिवासी कि वनवासी ?
केरळम्मधील दीपप्रज्वलनाचा वाद : राष्ट्रीय व्यक्तीमत्त्वाचा आत्मा संस्कृती कि धर्म ?
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !