पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याला धमकी !

नवी देहली – एका वृत्तवाहिनीवर चर्चा चालू असतांना पाकिस्तानी प्रतिनिधीने पिस्तूल काढून पाकव्याप्त काश्मीरमधील एका कार्यकर्त्याला धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती, तेथील नागरिकांचे प्रश्न आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा चालू होती. चर्चेत पाकिस्तानी प्रतिनिधी मेजर शेख एम्. नदीम यांना सुरक्षा आणि गुप्तचर कारवाया यांविषयी प्रश्न विचारण्यात आले. चर्चेत वाद वाढल्यानंतर नदीम यांचा संयम सुटला आणि त्यांनी कॅमेर्यासमोर थेट पिस्तूल दाखवून पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याला धमकी दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे चर्चेत काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी यांनी या कृतीवर टीका करत चर्चा चालूच ठेवली. प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी हा प्रकार करणे निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी