‘१३ आणि १४.१२.२०२५ या दिवशी देहली येथील भरत मंडपम्मध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. यानंतर २३.१२.२०२५ या दिवशी वाराणसी आश्रमात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संदर्भात सत्संग झाला. त्या सत्संगात देहली येथे सेवेला गेलेल्या साधकांनी त्यांचे अनुभव सांगितले.

१. साधकांची गुरुनिष्ठा पाहून आनंद होणे
साधकांचे अनुभव ऐकून माझ्या मनात आले, ‘गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) कार्य आणि गुरुदेवांचे साधक आता वेगळे राहिलेले नाहीत.’
गुरुदेवांना जेव्हा एखादा कार्यक्रम करणे अपेक्षित असते, तेव्हा परिस्थिती कितीही प्रतिकूल असली किंवा सध्याच्या परिस्थितीत साधकांची दैनंदिन सेवेची कितीही व्यस्तता असली, तरीही साधक त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धाव घेतात. ते स्वत:च्या क्षमतेनुसार कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. त्यांची निष्ठा पाहून माझे हृदय आनंदाने भरून येते.
२. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेले कार्य’ यांतील साम्य

अ. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अगदी मोजक्या मावळ्यांसह आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५ पातशाह्यांशी लढा दिला आणि ते विजयी झाले !
आ. त्याचप्रमाणे आजच्या कोट्यवधी असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत गुरुदेवांचे साधक संख्येने अत्यल्प आहेत. मी जाणते आणि मानतेही की, ‘गुरुदेवच कर्ता करविता आहेत.’ गुरुदेव या अल्प साधकांच्या माध्यमातून अत्यंत प्रतिकूल काळात अन् अल्प कालावधीत हिंदु राष्ट्रासाठी शौर्याची एक नवीन गाथा निर्माण करत आहेत. त्यांनी केवळ आम्हा साधकांनाच आश्वस्त केलेले नाही, तर ते सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे निराश झालेल्या समाजालाही आश्वस्त करत आहेत.
३. ‘भारत मंडपम्’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात एकाच वेळी लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अलौकिक कार्याच्या संदर्भातील प्रदर्शन’ हीसुद्धा ईश्वराची एक अगम्य लीलाच आहे.
‘अशा ईश्वरतुल्य गुरुदेवांच्या चरणी माझे कोटीशः नमन !’
– सौ. प्राची दशरथ मसूरकर (वय ६४ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (४.३.२०२६)
सनातन संस्थेचे अद्वितीय आश्रम !
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
वैदिक सरस्वती नदी आणि तिचे दैवी स्वरूप !
भारताची ‘सांस्कृतिक स्वातंत्र्य रणनीती’: सैन्यदलाच्या ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता) पालटातून उलगडणारे धडे !
बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !