
१. गणपतीला तुळस वाहू नये.
२. देवीला दूर्वा वाहू नयेत.

३. शिवलिंगावर केतकीचे फूल वाहू नये.
४. विष्णूला अक्षता वाहू नयेत.
५. पूजाघरात २ सारखे शंख ठेवू नयेत.
६. मंदिरात ३ गणपतीच्या मूर्ती ठेवू नयेत.
७. तुळशीचे पान चावून खाऊ नये.
८. दारात चप्पल-बूट उलटे ठेवू नयेत.
९. दर्शन करून परत येतांना घंटा वाजवू नये.
१०. एका हाताने आरती घेऊ नये.
११. ब्राह्मणाला आसनाविना बसवू नये.
१२. स्त्रियांनी दंडवत प्रणाम करणे वर्ज्य आहे.
१३. दक्षिणेविना ज्योतिषाला प्रश्न विचारू नये.
१४. घरात पूजेसाठी अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये.
१५. तुळशीच्या झाडाजवळ कुठेही शिवलिंग असू नये.
१६. गर्भवती महिलेने शिवलिंगाला स्पर्श करू नये.
१७. स्त्रियांनी मंदिरात नारळ फोडू नये.
१८. रजस्वला स्त्रीचा मंदिरात प्रवेश वर्ज्य आहे.
१९. कुटुंबात सूतक असल्यास पूजेच्या मूर्तीला स्पर्श करू नये.
२०. शंकराला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत.
२१. शिवलिंगावरून वहाणारे पाणी ओलांडू नये .
२२. एका हाताने नमस्कार करू नये.
२३. दुसर्याच्या दिव्याने स्वतःचा दिवा पेटवू नये.
२४. देवांना लोबान किंवा लोबानची उदबत्ती लावू नये.
२५. चरणामृत घेतांना उजव्या हाताखाली रूमाल धरावा, जेणेकरून एक थेंबही खाली पडणार नाही. चरणामृत पिऊन हात डोक्याला किंवा शेंडीला पुसू नयेत, तर डोळ्यांना लावावेत. शेंडीवर गायत्रीदेवीचा निवास असतो, तिला अपवित्र करू नये.
(क्रमश:)
– महंत सुधीरदास, श्री काळाराम मंदिर, नाशिक.
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
वैदिक सरस्वती नदी आणि तिचे दैवी स्वरूप !
भारताची ‘सांस्कृतिक स्वातंत्र्य रणनीती’: सैन्यदलाच्या ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता) पालटातून उलगडणारे धडे !
बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था