प्रवासी आणि कर्मचारी यांना करावा लागतो गैरसोयींचा सामना !
श्री. गोपीचंद व्हनमारे, सोलापूर

सोलापूर – येथील बसस्थानक हे राज्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. सोलापूर येथून सध्या असलेले जुने मध्यवर्ती एस्.टी. बसस्थानक वाढत्या प्रवासी संख्येमुळे अपुरे पडत आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार बसगाड्यांची संख्या वाढवली असली, तरी स्थानकातील स्वच्छता आणि व्यवस्थापन यांच्या गंभीर त्रुटी आढळून येत आहेत.

सध्या ५ कर्मचारी स्वच्छतेसाठी कार्यरत असून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत स्वच्छता केली जाते. प्रत्यक्षात स्वच्छतेची स्थिती अत्यंत असमाधानकारक असल्याचे दिसून आले. ‘१ जूनपासून स्वच्छतेचे कर्मचारी वाढवण्यात येतील’, असे सांगण्यात आले; प्रत्यक्षात तसे दिसून आले नाही. स्वच्छतागृहात गुटखा खाऊन थुंकलेले असणे, प्रवासी बसण्यासाठी बाके अल्प प्रमाणात असल्याने प्रवाशांना खालीच बसावे लागणे या समस्या आहेत. फलाटही स्वच्छ केले नसल्याने प्रवाशांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.


Ground Report | Solapur Bus Stand
❌ Garbage & poor cleanliness
❌ Toilets lack doors
❌ No drinking water
❌ Stray dogs
❌ Poor staff facilitiesImmediate inspection and corrective action needed.@msrtcofficial@PratapSarnaik pic.twitter.com/erTqag5zTy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
गाड्यांची खराब स्थिती आणि अस्वच्छता !
१. कित्येकदा बसगाड्यांची स्थितीही अत्यंत खराब असते. बसमध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, खाऊची पाकिटे, टरफले आणि धूळ दिसून येते. स्थानकातील सुरक्षा व्यवस्थाही अपुरी असून सुरक्षा कर्मचारी कुठेच दिसत नव्हते.

२. बसस्थानकात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

३. येथील उपहारगृहात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये आकारले जात असल्याची तक्रार आहे. स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा असली, तरी त्या ठिकाणी जो नळ आहे तो बंद असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते.
४. ‘हिरकणी कक्ष’ हा महिला चालक आणि वाहक यांसाठी कपडे पालटण्याच्या खोलीमध्ये उभारण्यात आला असला, तरी त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही.
| हे ही वाचा → वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच ! |
चालक-वाहक यांचे अस्वच्छ विश्रांतीगृह !

चालक आणि वाहक यांच्या विश्रांतीगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. झोपण्यासाठी आवश्यक सोयींचा अभाव आहे. काही कर्मचार्यांनी गाद्यांची व्यवस्था केली असली, तरी अधिकृत पातळीवर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

चालक-वाहक यांच्यासाठी असलेले शौचालय आणि स्नानगृह यांची अवस्था अत्यंत दयनीय असून अनेक ठिकाणी दारेही नाहीत. तात्पुरत्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये कर्मचार्यांना विश्रांती घ्यावी लागत आहे. तेथेही स्वच्छतेचा अभाव आहे.

त्रुटींवर उपाययोजना काढण्याचे आगारप्रमुखांचे आश्वासन !या संदर्भात आगारप्रमुख उत्तम जुंदळे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी ‘हिरकणी कक्षा’च्या ठिकाणी फलक लावू, नाथजलाच्या संदर्भात योग्य त्या मूल्याने विक्री करण्याच्या सूचना देऊ’’, असे सांगितले. सुलभ सौचालय या ठिकाणी जो कर्मचारी गुटखा खाऊन येतो, त्याला तातडीने ५०० रुपये दंड आकारण्याचा आदेश त्यांनी दिला, तसेच सुरक्षारक्षकांनी व्यवस्थित पहारा देणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. |
-बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा ! हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !नागरिकांना आवाहन !‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे. सूचना नोंदवा !वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा ! |
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी