
कोल्हापूर – जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक रत्नागिरी येथील शाळेत कार्यरत होते. त्यांनी आंतरजिल्हा स्थानांतरासाठी आवेदन केले होते. त्यानुसार ४ महिन्यांपूर्वी स्थानांतर होऊन ते कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत उपस्थित झाले. स्थानांतरासाठी कोल्हापूर महापालिकेचे शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनी शिक्षकाकडून १० सहस्र रुपये घेतले होते. यानंतर ३ महिन्यांचे थकित वेतन आणि फरक काढण्यासाठी कुंभार यांनी ४० सहस्र रुपये मागितले. तडजोडीअंती २५ सहस्र रुपये देण्याचे ठरले. शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा रचून शिक्षकाकडून लाच घेतांना डी.सी. कुंभार यांना अटक केली.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे