(हनी ट्रॅप म्हणजे महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवणे. शत्रू राष्ट्राच्या हेर महिलेने सैन्याधिकारी अथवा सैनिक यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सैन्यातील गोपनीय माहिती हस्तगत करण्यासाठी आखलेल्या षड्यंत्राला हनी ट्रॅप म्हणतात.)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – डोडा जिल्ह्यातील एका तरुणाचा ‘हनी ट्रॅप’ करण्याचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय. चा (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) डाव फसला. एका पाकिस्तानी महिलेच्या नावाने आलेल्या फेसबुकवरील ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडता या तरुणाने देशद्रोह करण्यास स्पष्ट नकार दिला. पैशांच्या बदल्यात सीमाभागातील भारतीय सुरक्षा दलांच्या ठाण्यांची आणि हालचालींची छायाचित्रे पाठवण्यास त्याला महिलेने सांगितले होते.
सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी
तरुणाला पाकिस्तानवरून येणार्या संशयास्पद ‘व्हॉट्सॲप कॉल्स’वर भारतीय सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून होत्या. याच संशयावरून पोलिसांनी तरुणाच्या घरावर धाड घालून त्याला कह्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. या वेळी त्याचे निर्दाेषत्व सिद्ध झाल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. तथापि सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून तो सध्या पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !