मुख्य आरोपीसह १४ धर्मांधांवर गुन्हे नोंद शहराच्या इतिहासातील पहिलीच मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३१ गोवंशियांची सुटका केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने गोवंश तस्करांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. जिन्सी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात चालणार्या या अवैध गोवंश तस्करी आणि साठवणुकीच्या टोळीविरुद्ध थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली. गोवंश तस्करी किंवा अवैध कत्तल करणार्या टोळीविरुद्ध मकोका लावण्याची छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील ही पहिलीच ऐतिहासिक कारवाई ठरली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या धडक कारवाईला पूर्वअनुमती दिली आहे. (राज्यामध्ये गोहत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे प्रत्येक वेळी गोवंशियांची हत्या करणार्यांवर मकोका लावण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील का ? प्रशासनाने आता या सर्व आरोपींची अवैध मालमत्ता जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे, तरच त्यांना जरब बसेल ! – संपादक)
MCOCA invoked against a cattle-smuggling gang in Chhatrapati Sambhajinagar; cases registered against 14 accused, including the kingpin.
131 cattle rescued
This is the first major action of its kind in the city's history and sends a strong message to organised cattle-smuggling… pic.twitter.com/PJRw2v8cru
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 2, 2026
टोळीप्रमुख जुबेर कुरेशीसह १४ धर्मांधांवर मकोका !
या संघटित गुन्हेगारी टोळीमध्ये गोमाता आणि गोवशियांचे रक्त सांडणार्या धर्मांध आरोपींचा समावेश असून त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात टोळीप्रमुख जुबेर शफिक कुरेशी, मोहसीन अयुब कुरेशी, महंमद समीर महंमद शरीफ कुरेशी, मुजीब उपाख्य मुजाहिद तय्यब कुरेशी, शेख कय्युम कुरेशी, शेख अयुब कुरेशी, सलीम कुरेशी, शेख चांद कुरेशी, वसीम शकील उपाख्य शफी कुरेशी, काझी कलीम अहमद, काझी महंमद शरीफ, शेख रऊफ शेख युनूस अशी धर्मांधांची नावे आहेत.
दुधाच्या गोठ्याआड गोमांसाची अवैध विक्री
जिन्सी भागातील या आरोपींनी लोक आणि पोलीस यांची दिशाभूल करण्यासाठी गोठ्यामध्ये ८ ते १० दुधाळ म्हशी पाळल्या होत्या; मात्र याच म्हशींच्या आड प्रत्येकी ४ ते ५ गोवंश छुप्या पद्धतीने आणून ठेवले जात असत. अधिकृत दूध व्यवसायाच्या नावाखाली याच गोठ्याला लागून अत्यंत गुप्तपणे जनावरांची कत्तल करून गोमांसाची अवैध विक्री केली जात होती.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन