महामंडळाची २६ कोटी रुपयांची हानी झाल्याचा दावा
चौकशी करण्याचा महामंडळाच्या अध्यक्षांचा आदेश

पुणे – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’चे (‘पी.एम्.पी.एम्.एल्.’चे) ‘स्टेनलेस स्टील’ने बनवलेले ८६५ बसथांबे आणि १० बस आगारांत विज्ञापन करण्यासाठी आलेल्या एकमेव निविदेमुळे ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’च्या कोट्यवधी रुपयांची हानी होत असल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केला आहे. याविषयीचे निवेदन संभूस यांनी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना दिले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आव्हाड यांनी दिले आहेत.
PMPML bus stop advertising scam: Multi-crore scam in advertising at Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd. (PMPML) bus stops and depots; MNS alleges Corporation has suffered ₹26 Crore loss
Corporation Chairperson orders enquiry pic.twitter.com/XrPJoNFRit
— Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat) June 2, 2026
‘पी.एम्.पी.एम्.एल्.’मधील विज्ञापनासाठी ३ निविदा येणे आवश्यक असते. केवळ एकाच ठेकेदाराची निविदा आल्याने तिला मान्यता दिली. प्रत्येक थांब्यासाठी १२ सहस्र रुपये शुल्क येणे अपेक्षित असतांना ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ने केवळ ७ सहस्र रुपये भाडे मान्य केले. यामुळे महामंडळाला महिन्याला ४३ लाख २५ सहस्र रुपये आणि ५ वर्षांच्या कराराप्रमाणे २५ कोटी ९५ लाख रुपयांची हानी होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने रहित करण्याची मागणी संभूस यांनी केली आहे.
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !