Exclusive News : मुसलमानांच्या दबावापुढे झुकत पोलिसांनी आमदार टी. राजासिंह यांच्या धर्मसभेला अनुमती नाकारली !

  • भोपाळ (मध्यप्रदेश) येथील घटना

  • पोलीस प्रशासनाने गर्दी आणि चेंगराचेंगरी यांचे कारण देत दिला आदेश

  • ‘धर्मरक्षक’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेने केले होते धर्मसेभेचे आयोजन

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे ३१ मे या दिवशी होणारी धर्मसभा रहित करण्यात आली आहे. यामुळे भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या व्याख्यानाला सहस्रो भोपाळवासी मुकणार आहेत. मध्यप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘धर्मरक्षक’ने या सभेचे आयोजन केले होते; परंतु भोपाळ पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला अनुमती नाकारली. मुसलमानांच्या दबावापुढे झुकत पोलिसांनी अनुमती नाकारल्याची विश्वासार्ह माहिती ‘सनातन प्रभात’ला मिळाली. पोलिसांच्या या आदेशाच्या विरोधात आयोजकांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालय गाठले; परंतु न्यायालयाने १ जूनला सुनावणीचा दिनांक ठेवल्याने सभा रहित करावी लागली, अशी माहिती ‘धर्मरक्षक’चे भोपाळ जिल्हाध्यक्ष श्री. विवेक मेषकर यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. यासंदर्भात भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.

एका महिन्याच्या आत मी भोपाळमध्येच यापेक्षा मोठी सभा घेऊन दाखवीन ! – आमदार टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह

सभा रहित झाल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, जिहादी गेले १० दिवस सामाजिक माध्यमांवर मला विरोध करत आहेत. त्यांना मला भोपाळमध्ये येऊ द्यायचे नाही. त्यांनी पोलिसांना निवेदनही दिले. दुर्दैव आहे की, मध्यप्रदेश पोलीस जिहाद्यांच्या दबावाखाली आले आणि त्यांनी सभेला अनुमती नाकारली. हे लज्जास्पद आहे. भोपाळ शहर ‘लव्ह जिहाद’चा गड बनत चालला आहे. प्रत्येक आठवड्याला तेथे हिंदु मुलींवर बलात्कार केले जात आहेत. खरेतर पोलिसांनी ‘लव्ह जिहाद्यां’ना पकडायला हवे.

मध्यप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात अधिक कठोर कायदा केला पाहिजे. हे करायचे सोडून ते हिंदूंच्या सभांना अनुमती नाकारत आहेत. मध्यप्रदेशात भगवे सरकार असतांना हिंदूंच्या पक्षामध्ये निर्णय झाले पाहिजेत. जिहाद्यांना घाबरून असे निर्णय घेतले गेले, तर याने हिंदूंचे मनोबल तुटेल. यावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विचार करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. मी पुढील एका महिन्यात भोपाळमध्ये यापेक्षा मोठी सभा घेऊन दाखवीन.

आमदार टी. राजा सिंह यांना मुसलमानांनी दिली जिवे मारण्याची धमकी !

भोपाळमधील मुसलमानांनी आमदार टी. राजा सिंह यांच्यावर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. महंमद आमिर खान आणि अराज नावाच्या व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर म्हटले की, ‘जर राजा सिंह यांनी मुसलमानांच्या विरोधात वक्तव्य केले, तर त्यांना भोपाळमधून जिवंत जाऊ देणार नाही.’

यावर ‘धर्मरक्षक ग्रामीण’चे समन्वयक श्री. शिशुपाल ठाकूर म्हणाले की, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. अशा जिहाद्यांना चिन्हित करून त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकशाहीत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही.

 न्यायालयाची भूमिका

असा आहे घटनाक्रम !

१. ‘धर्मरक्षक’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेने भोपाळमधील गांधीनगर भागातील बस स्टँडच्या परिसरात एका जाहीर धर्मसभेचे आयोजन केले होते. सभेला आमदार टी. राजासिंह संबोधित करणार होते. याला किमान ५ सहस्र हिंदू उपस्थित रहाण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली होती.

२. तथापि भोपाळ पोलिसांनी या प्रकरणी अनुमती दिली नाही. पोलिसांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा संदर्भ देत ‘टी. राजासिंह यांच्या सभेला अनुमती देता येणार नाही. तुम्ही अन्य वक्त्यांना निमंत्रित करा’, असे आयोजकांना सांगितले. आयोजकांनी त्यासंदर्भात लेखी आदेश देण्याची विनंती केली असता २६ मेच्या रात्री, म्हणजे सभेच्या ५ दिवसांआधी गर्दीचे थातूरमातूर लेखी कारण देत सभेलाच अनुमती नाकारली.

३. सभेचे स्थळ गर्दीचे ठिकाण असल्याने येथे सभा घेतली, तर गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असे कारण देण्यात आले.

४. सभा ४ दिवसांवर आल्याने २७ मे या दिवशी या आदेशाच्या विरोधात आयोजकांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालय गाठले. न्यायालयाच्या जबलपूर खंडपिठाने या प्रकरणी ‘मध्यप्रदेश सरकारची भूमिका जाणून घेतल्याखेरीज अनुमती देता येणार नाही’, असे सांगत २९ मेच्या सुनावणीच्या वेळी १ जूनला पुढील सुनावणीचा दिनांक दिला. या वेळी मुख्य न्यायाधिशांकडेही विनंती करण्यात आली होती. ३१ मे हा सभेचा दिनांक असल्याकारणाने सभा रहित करावी लागली, अशी माहिती ‘धर्मरक्षक’ने ‘सनातन प्रभात’ला दिली.

पोलिसांनी नाकारलेली अनुमती

सभा रहित होण्यामागील कारण

१५-२० दिवसांपूर्वी भोपाळमध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणावरून हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. यावरून ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून ‘भोपाळमध्ये होणारी टी. राजासिंह यांची सभा रहित करावी’, अशी मागणी केली. यानंतर संघटनेचे मध्यप्रदेश अध्यक्ष हाजी महंमद हारून यांनीही भोपाळच्या पोलीस आयुक्तांना भेटून ‘भोपाळची कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, असे कारण देत सभेला अनुमती देऊ नये’, या मागणीचे निवेदन दिले.

विशेष म्हणजे ‘गर्दी आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती’ हे जे कारण देऊन अनुमती नाकारली गेली, त्या मैदानावर याआधी अनेक राजकीय पक्षांच्या सभा झाल्या आहेत. तथापि हिंदूंच्या या सभेला अनुमती नाकारण्यात आल्याने हिंदूंमध्ये संताप आहे.

मध्यप्रदेश पोलिसांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता नाही ! – धर्मरक्षक

या संदर्भात ‘धर्मरक्षक’चे जिल्हाध्यक्ष श्री. विवेक मेषकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, टी. राजासिंह हे तेलंगाणा येथे रहातात. त्यांच्या भाषणाने तेथील कायदा-व्यवस्था कधी बिघडत नाही. याचा अर्थ तेलंगाणा पोलीस तेवढी सक्षम आहे; परंतु मध्यप्रदेश पोलिसांना या गोष्टींचे भय वाटते. याचा अर्थ मध्यप्रदेश पोलिसांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता नाही, असेच यावरून म्हणता येईल.

न्यायालय आम्हाला धर्मसभा घेण्याचा जो दिनांक देईल, त्या दिवशी आम्ही सभा घेऊ ! – ‘धर्मरक्षक’चे अधिवक्ता अतुल जेस्वानी

या प्रकरणी ‘धर्मरक्षक’च्या वतीने न्यायालयात लढणारे अधिवक्ता अतुल जेस्वानी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पोलीस कायद्यातील (पुलिस ॲक्ट) ‘कलम ३० उपकलम २’नुसार पोलीस कोणत्याही कार्यक्रमाची अनुमती नाकारू शकत नाहीत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. १ जूनला होणार्‍या सुनावणीच्या वेळी न्यायालय आम्हाला सभा घेण्याची जी दिनांक देईल, त्या दिवशी आम्ही सभा घेण्याचे घेऊ.

संपादकीय भूमिका

  • केंद्र, राज्य आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • हिंदूंनो, अंतर्मुख व्हा ! मुसलमानांच्या मागण्यांपुढे सरकार, प्रशासन, पोलीस झुकतात. याचे कारण आहे त्यांचा दबाव आणि झुंडशाहीची प्रवृत्ती ! किती हिंदु संघटना एकत्र येऊन असा दबाव आणतात की, सरकारला त्यांचे ऐकणे भाग पडले पाहिजे ?
  • धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य प्रदान करणार्‍या राज्यघटनेतील कलम १९ अ, १९ ब, २५ आणि २६ धाब्यावर बसवून हिंदूंवर अन्याय करणारे मध्यप्रदेश पोलीस !