संपादकीय : बळी प्रथेच्या माध्यमातून इस्लामचे वाढते प्रस्थ !

मुंबईमध्ये ‘बकरी ईद’च्या निमित्ताने १० सहस्रांहून अधिक पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी प्राणी हत्या न करण्याविषयी सर्वाेच्च न्यायालय, तसेच उच्च न्यायालये यांनी वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. ‘बकरी ईद’ आली की, काही दिवस आधीपासून ‘सोसायट्यांमध्ये प्राणी हत्या करण्यात येऊ नयेत’, यासाठी मागील काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिका प्रतिवर्षी परिपत्रके काढत आहेच. या कशालाही भीक न घालता मुसलमान मात्र त्यांची धर्मांधता सोडायला सिद्ध नाहीत. न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवून आणि प्रशासनाला न जुमानता मुंबईतील सोसायट्यांमध्ये बकरी ईदच्या दिवशी सर्रासपणे बळी दिला जातो. मागील २ दिवसांपासून मुंबई पोलिसांनी अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन शेकडो बोकड कह्यात घेतले. मीरा-भाईंदर येथे तर एका-एका सोसायटीतून १२-१५ बोकड बाहेर काढण्यात आले. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाले आहेत. ईदच्या आधी आठवडाभर बोकड आणून सोसायटीच्या आवारातच त्यांच्यासाठी पत्र्याची शेड बांधली जाते. आठवडाभर त्यांना चारा-पाणी देऊन ईदच्या दिवशी त्यांच्या गळ्यावरून सुरा फिरवला जातो. त्याचा सोसायटीमधील अन्य रहिवाशांना त्रास होतो. त्यापेक्षाही बोकड कापून त्यांच्या रक्ताचा सडा सोसायटीच्या परिसरात पडल्यामुळे आणि त्यांचे अवशेष उघड्यावर टाकल्यामुळे पुढील काही दिवस सोसायटीमध्ये अत्यंत दुर्गंध येण्यासह कुबट वास पसरतो. हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत हानीकारक आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी, होळी, रंगपंचमी, दसरा अशा हिंदूंच्या सर्वच सणांच्या वेळी प्रदूषणाची जे टिमकी वाजवत असतात, ते कथित पुरोगामी अन् हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित पर्यावरणप्रेमी या वेळी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या प्राण्यांच्या हत्यांविषयी आणि त्यामुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी तोंड उघडायलाही सिद्ध नाहीत.

ईदला कापण्यासाठी आणलेल्या बोकडांसाठी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी असलेली झाडे आणि बागांमधील झाडांचा पाला मुसलमानांनी ओरबाडून नेला. सार्वजनिक ठिकाणी बोकड कापणे अन् त्यांचे अवयव उघड्यावर फेकणे, हा सर्व प्रकार म्हणजे सामाजिक दायित्वाविषयी असंवेदनशीलताच आहे. अन्य रहिवाशांची पर्वा न करता मुंबईतील सोसायट्यांमध्ये वर्षानुवर्षे बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या हत्या केल्या जात आहेत. मागील काही वर्षांत यांविषयी मुंबई महानगरपालिकेकडे सहस्रो तक्रारी येऊनही हे प्रकार रोखण्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही. ईदच्या दिवशी सोसायट्यांमध्ये प्राणी न कापण्याविषयी परिपत्रक काढण्याचा सोपस्कार मात्र प्रशासन करते आणि काही पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या जातात अन् पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’, असे प्रकार वर्षानुवर्षे चालू आहेत. न्यायालय, प्रशासन यांना न जुमानता चालू असलेली ही धर्मांधता, म्हणजेच मुसलमानांचा उद्दामपणा होय. हा उद्दामपणा वेळीच रोखला नाही, तर येत्या काळात मुसलमानांची धर्मांधता केवळ मुंबईतील सोसायट्यांमधील बळी देण्यापुरती मर्यादित रहाणार नाही, तर भारताच्या इस्लामीकरणाची एक प्रक्रिया आहे.

इस्लामचे प्रस्थ वाढवण्यासाठी !

दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर

सोसायट्यांमध्ये अन्य समाजाचे नागरिक असूनही तेथे बकर्‍यांसाठी मोठमोठ्या शेड बांधणे एवढ्यापुरताच हा उद्दामपणा मर्यादित नाही. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील दुर्गाडी गडावर हिंदवी स्वराज्यासाठी आरमार बांधण्याला प्रारंभ झाला. त्या दुर्गाडी गडावरील ‘श्री दुर्गादेवीचे मंदिर हे मशीद असल्याचा दावा करणे, गडावर असलेली भिंत ‘ईदगाह’ असल्याचा दावा करणे’, या माध्यमातून मुसलमान येथे मागील अनेक वर्षांपासून बकरी ईद आणि रमजान ईद या दिवशी रस्ता अडवून नमाजपठण करतात. वर्ष २०२५ मध्ये महाराष्ट्राचे विधीमंडळाचे अधिवेशन चालू असतांना विधानभवनाच्या बाजूचा पादचारी मार्ग अडवून नमाजपठण करणे, हे मुसलमानांच्या उद्दामपणाचेच लक्षण आहे. वरवर हा धार्मिक विधी वाटत असला, तरी त्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन आणि त्याद्वारे भारतात इस्लामचे प्रस्थ वाढवण्याचा हा प्रकार आहे. मुंबईमधील सोसायट्यांमध्ये बोकड कापण्याचा हा प्रकारही इस्लामचे प्रस्थ वाढवण्याचाच प्रकार आहे. बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या हत्या उघडपणे चालू असल्यामुळे हा स्वत:चा धार्मिक अधिकार असल्याचे मुसलमानांना वाटायला लागले आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वेस्थानकाच्या बाजूला ४० वर्षांहून अधिक काळ अवैधरित्या वसवण्यात आलेली बेसुमार झोपडपट्टी प्रशासनाने हटवली. त्या वेळी झोपडपट्ट्यांमधील मुसलमानांचा आक्रोश वारंवार प्रसारित करून माध्यमांनी मुसलमानांना पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. अवैध बांधकामाला चुकीचे ठरवण्याऐवजी त्यावरील कारवाई कशी अमानवीय आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांनी दंगा केला, बलात्कार केले, हत्या केल्या, तरीही त्यांना पीडित दाखवण्याची मानसिकता भारतामध्ये वर्षानुवर्षे निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील जिहादी कारवायांमध्ये, तसेच गुन्हेगारीमध्ये मुसलमानांचा उच्चांक सर्वाधिक असला, तरीही त्यांच्याविषयी माध्यमांद्वारे सहानुभूती निर्माण केली जाते अन् त्यांची गुन्हेगारी वृत्ती झाकली जाते. यापूर्वी काँग्रेसच्या राजाश्रयामुळे माध्यमांचा जणू हा अजेंडाच झाला होता; परंतु वांद्रे येथील कारवाईविषयी मुसलमानांना पीडित दाखवण्याचा प्रयत्न करणार्‍या माध्यमांनाच नागरिकांनी समाजमाध्यमांवर फैलावर घेतले. त्यामुळे वर्षानुवर्षे देशात चालू असलेल्या मुसलमानांच्या लांगूलचालनाविषयी हिंदु समाज आता सतर्क होत आहे.

‘अल्पसंख्यांक’ म्हणून धर्मांधता पोसायची का ? 

मुंबईत बकरी ईदच्या निमित्ताने पोलीस आणि प्रशासन यांनी एकत्रित केलेली ही कारवाई येणार्‍या काळासाठी एक धडा ठरेल, अशी आशा आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही त्याचे उल्लंघन सर्रासपणे चालू आहे. हे प्रकार पोलिसांच्या साहाय्याविना अशक्य आहेत. लव्ह जिहादच्या अनेक घटना राज्यात सातत्याने घडत आहेत; मात्र तक्रार करूनही त्याविषयी पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. सरकार, पोलीस आणि प्रशासन यांनी ठरवले, तर मुसलमानांची धर्मांधता ठेचणे अवघड नाही; पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना या हिंदुत्वनिष्ठ पक्षांचा समावेश असलेले शासन हिंदूंच्या बहुमताने सत्तेत आले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात अल्पसंख्यांक मुसमलमानांना सर्वच क्षेत्रांत झुकते माप दिले गेले. राजाश्रय दिला. मुसलमानांच्या उद्दामपणाचे मूळ यातच आहे. ‘मुसलमान’ म्हणून कुणावर अन्याय होऊ नये; मात्र त्यांचा उद्दामपणा आणि धर्मांधता ‘अल्पसंख्यांक’ म्हणून गोंजारण्याची चूक सरकारकडून न होणे श्रेयस्कर ! मुंबईप्रमाणे मुसलमानांचा सर्वच स्तरांवरील उद्दामपणा सरकारने मोडीत काढावा.

सार्वजनिक ठिकाणी बळी देणार्‍या धर्मांध मुसलमानांची सर्व स्तरांतील धर्मांधता मोडून काढा !