Mumbai Thook Jihad : गोरेगाव (मुंबई) येथे सतर्क हिंदूने उघड केला ‘थुंकी जिहाद’चा प्रकार !

  • ग्राहकांना थुंकलेली पोळी देत असल्याचे प्रकरण

  • पोलिसांनी उपाहारगृह मालक फैय्याज आणि जेवण बनवणारा कौशार यांना नोटीस देऊन सोडले !

पोळीवर थुंकणारा कौशार गफार शेख

मुंबई – गोरेगाव येथील संतोषनगर परिसरातील ‘फिश कोळीवाडा’ उपाहारगृहात बनवल्या जाणार्‍या प्रत्येक पोळीवर थुंकून ती ग्राहकांना दिली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी उपाहारगृह मालक फैय्याज अहमद शेख आणि जेवण बनवणारा कौशार गफार शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला; मात्र चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून दिले.

येथील दीपक पवार हे या उपाहारगृहाजवळून जात असतांना त्यांना कौशार शेख पोळीवर थुंकत असल्याने दिसले. संशय आल्याने त्यांनी काही वेळ थांबून निरीक्षण केले असता तो प्रत्येक पोळीवर थुंकून ती भट्टीत टाकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तीच पोळी ग्राहकांना दिली जात होती. त्यांनी हा प्रकार भ्रमणभाषमध्ये चित्रीत केला. हा प्रकार सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्याची नोंद घेतली.

संपादकीय भूमिका

  • ग्राहकांच्या आरोग्याची हानी होत असतांनाही मुसलमान आरोपींना सोडून देणार्‍या पोलिसांनाच कारागृहात डांबायला हवे !
  • थुंकलेली पोळी देणार्‍यांना सोडून न देता या पोळ्या दुकानाच्या मालकाला आणि कामगारांनाच खायला देऊन अशा उपाहारगृहांवर बंदी आणायला हवी !