मुंबई महापालिकेकडून घाटकोपर येथील इमारतीत बकर्‍याचा बळी देण्याची अनुमती रहित !

  • ३० वर्षांपासून बकर्‍याच्या बळीची परंपरा खंडित !

  • पालिका जागा देईल तेथे बळी देण्याचा मुसलमानांचा पवित्रा !

मुंबई – घाटकोपरच्या सागर पार्क इमारतीत बकर्‍याचा बळी देण्याला विरोध होत आहे. येथे गेल्या ३० वर्षांपासून बकर्‍याचा बळी देणे चालू होते; पण २६ मेच्या मध्यरात्री अचानक महापालिकेने बकर्‍याचा बळी देण्याची अनुमती रहित केली. त्यानंतर तेथील मुसलमानांनी सांगितले, ‘‘आम्ही बकर्‍याचा बळी इमारतीच्या आवारात देणार नाही; पण महापालिकेने आम्हाला दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी. आम्हाला इमारतीचे नाव खराब करायचे नाही.’’ या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आली होती.

बळीसाठी मुंबई महापालिका त्यांना योग्य ठिकाणी जागा देणार ! – किरीट सोमय्या

भाजपचे नेते किरीट सोमय्या

यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘सागर पार्क इमारतीत ठेवलेल्या ३१ बोकडांपैकी २३ बोकडांना मुंबई महानगरपालिकेने कह्यात घेतले. यापुढे एकाचाही बळी येथे दिला जाणार नाही. बळीसाठी मुंबई महापालिका त्यांना योग्य ठिकाणी जागा देणार आहे. सुरक्षा राखणे हे पोलिसांचे काम आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावेच लागते.’’

निवासी सोसायट्यांमध्ये पशूवधगृहे निर्माण करणे योग्य नाही ! – शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘‘निवासी सोसायट्यांमध्ये पशूवधगृहे निर्माण करणे योग्य नाही. धार्मिक सण साजरे करण्यास कुणाचाही विरोध नाही; मात्र ज्या ठिकाणी लोक रहातात, त्या निवासी भागात अशा प्रकारे प्राण्यांची हत्या होणे योग्य नाही.’’

संपादकीय भूमिका

हिंदू मोठ्या प्रमाणात संघटित झाल्यास मुसलमान नरमतात, हे या घटनेवरून लक्षात येते !