भारत-बांगलादेश सीमेवर आसामपासून बंगालपर्यंत तणाव

ढाका (बांगलादेश) – बंगालमधील विधानसभेचे निकाल लागून भाजपचे सरकार आल्यापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. हा तणाव विशेषतः भारत-बांगलादेशाच्या ४ सहस्र ९६ किलोमीटर लांबीच्या सीमेच्या त्या भागांत दिसून येत आहे, जिथे काटेरी तारांचे कुंपण आहे. घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे बांगलादेशाचा पक्ष संतापलेला दिसत आहे.
९ मेपासून सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांच्यात चकमकीच्या ८ घटना घडल्या आहेत. यामध्ये बांगलादेशी नागरिकांची चिथावणीखोर भूमिका राहिली आहे. ९ मेपासून जवळपास प्रतिदिन गोळीबार किंवा घुसखोरी रोखण्यावरून हिंसाचाराची घटना घडत आहे. आसामपासून बंगालपर्यंतच्या सीमेवर हे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशाचे सीमा सुरक्षा दल सीमावर्ती भागातील लोकांना समजावून सांगण्यासाठी मोहीम राबवत आहे.
१. ‘बीजीबी’चा दावा आहे की, त्यांच्या गस्ती पथकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी १६ मे या दिवशी बिजॉयनगर (ब्राह्मणबारिया) येथे सीमा सुरक्षा दलाकडून ७५० भारतीय नागरिकांना बांगलादेशी हद्दीत ढकलण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर १८ मे या दिवशी सोनारहाट सीमा क्षेत्रात गोळीबार झाल्याचा दावा बीजीबीने केला आहे.
२. बीजीबीने ‘झिरो पॉईंट’ नियमांचे उल्लंघन केल्याचा हवाला देत सीमा सुरक्षा दलावर अनेक आरोप केले. करीमगंजमधील झिरो पॉईंटवर २५ मे या दिवशी पुन्हा एकदा दोघांमधील तणाव वाढला. दोघांतील चालू असलेल्या चकमकीत बांगलादेशी ग्रामस्थ आक्रमकपणे पुढे येतात आणि बीजीबीसाठी ‘ढाल’ बनतात.
३. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीजीबीने ब्राह्मणबारिया सीमेवर मेगाफोनचा वापर करून जनजागृती मोहीम चालू केली आहे. यामध्ये स्थानिक रहिवाशांना घुसखोरी आणि अनुमतीविना सीमा ओलांडण्याबाबत सतर्क केले जात आहे. बीजीबीचे लेफ्टनंट कर्नल शरीफुल इस्लाम यांनी सांगितले की, ही मोहीम स्थानिक लोकांना सतर्क रहाण्याचे आणि सीमा सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करते.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !