‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. उल्हासनगर येथील सिंधी समाजामध्ये ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात जागृती
‘मुंबईच्या उल्हासनगर येथे मोठ्या प्रमाणात सिंधी समाज आहे. ते सकाळपासून दुपारपर्यंत व्यवसाय करतात. दुपारनंतर ते त्यांचे कार्यालय किंवा दुकान बंद करून विश्रांती करण्यासाठी घरी जातात. हे लक्षात आल्यानंतर ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी सिंधी लोकांची दुकाने दामदुप्पट दराने भाड्याने घेतली आणि तेथे प्रार्थनासभांचे आयोजन करणे चालू केले. याविषयी मला वर्ष २०१५ मध्ये समजले. त्यानंतर आम्ही दुकान मालकांना संपर्क केला आणि त्यांना ‘जे तुमच्या धर्मावर आघात करत आहेत, त्यांचा पैसा घेऊन तुम्ही काय करणार ? उद्या हेच लोक तुमचा गळा कापणार’, अशा शब्दांत समजावून सांगितले. यानंतर ९ दुकानदारांनी त्यांच्या दुकानांमध्ये प्रार्थनाघराच्या रूपात चालवली जाणारी ९ चर्च बंद पाडली.
धर्मकार्य करतांना आपल्याला पुष्कळ सार्या अडचणींना तोंड द्यावे लागते. आमचे गुरुदेव सत्गुरु बाबा शिवानंद महाराज म्हणायचे, ‘जे कार्य करतांना संकट आले, तर ते कार्य चांगले आहे, असे समजून ते कार्य करणे चालू ठेवावे. समजा कार्यात संकट आले नाही, तर ते कार्य करणे सोडून द्यावे.’ जेव्हा आम्ही आमच्या धर्मबंधूंना धर्मांतर न करण्यासाठी समजावून सांगू लागलो, तेव्हा आमचे लोक अप्रसन्न झाले. त्यानंतर एक वर्षांनी मी तेथे गेलो. त्या वेळी मी ‘कुणालाही दुसर्या धर्माकडे जाऊ नका’, असे सांगितले नाही. त्यांच्या नातेवाइकांकडे सत्संग आणि प्रवचने घेणे चालू केले अन् हळूहळू धर्मजागृती चालू केली.
श्री. प्रकाश सिरवाणी यांचा परिचय

श्री. प्रकाश सिरवाणी ‘भारतीय सिंधू सभे’चे विदर्भ धर्मप्रचारक आहेत. त्यांनी ‘जीव आनंद सेवा समिती’ची स्थापना केली आहे. विविध भागांमध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी ते सत्संग, प्रवचन आणि कथावाचन यांचे आयोजन करतात. सिंधी समाजातील तरुणांना त्यांचे मूळ, भाषा, संस्कृती आणि धर्म यांच्याशी जोडून ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
२. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना धर्मशिक्षित करणे आवश्यक !
‘धर्माे रक्षति रक्षितः ।’, म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे रक्षण धर्म (म्हणजे ईश्वर) करतो.’ या श्लोकापूर्वीचा ‘धर्म एव हतो हन्ति धर्माे रक्षति रक्षितः ।’, म्हणजे ‘धर्माचे पालन न करणार्याचा विनाश होतो आणि जो धर्माचे काटेकोर पालन करतो, त्याचे रक्षण धर्म (म्हणजे ईश्वर) करतो.’ हा श्लोक कुणी सांगत नाही. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी गीता, भागवत, उपनिषदे इत्यादी ग्रंथ वाचले पाहिजेत. आपण स्वतःच आपल्या धर्मग्रंथांचे वाचन केले, तर आपल्याला दुसर्याला धर्म समजावून सांगणे अतिशय सोपे जाईल. त्यामुळे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात काहीच अडचण येणार नाही.
हिंदू मनाने अत्यंत कोमल आणि अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्यावर आक्रमणे होत असतात. मला ‘मी सिंधू सभ्यतेचा’ आणि ‘सिंधू सभ्यता’ ही जगातील सर्वांत प्राचीन असल्याचा मला अभिमान आहे. राजा दाहिर यांच्यावर महंमद बिन कासिम याने अनेक वेळा आक्रमणे केली; परंतु तो त्यांना हरवू शकला नाही. त्यानंतर कासिम याने दाहिरच्या सेनापतीला राजा करण्याचे प्रलोभन दाखवले आणि वर्ष ७१२ मध्ये राजा दाहिरचा पराभव झाला. अशाने सिंध प्रांत कासिमच्या कह्यात गेला. असे घरभेदी लोक आजही आपल्यात आहेत. त्यांची मनोवृत्ती पालटणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यात धर्मजागृती करावी लागेल.
३. भागवत कथावाचनाच्या माध्यमातून धर्मप्रसार
भगवान वरुण देव आणि भगवान झुलेलाल यांनी हिंदु संस्कृतीचे रक्षण केले. भगवान झुलेलाल यांनी शेवटी त्यांच्या शिष्यांना उपदेश केला होता, ‘जेव्हा धर्माची हानी होते, तेव्हा ईश्वराचा अवतार होतो.’ ईश्वर संतांच्या रूपातही अवतार घेऊ शकतो; पण आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. आपल्या विचारांचे नाव संत आहे. जर आपल्या विचारांमध्ये एखाद्या प्रती दया आणि करुणा जागृत झाली, तर आपण सर्व संत म्हणण्यायोग्य होऊ. धर्माला समवेत घेऊन चाललो, तरच धर्माचे रक्षण करण्यासाठी विश्वस्तरावर उत्तमरित्या कार्य करता येईल. हे लक्षात घेऊन मी वर्ष २०१५ पासून सर्वांना धर्मशिक्षण देण्याचे कार्य चालू केले आणि ते आजही निरंतर चालू आहे. आमच्या भागवत कथावाचनात पुष्कळ लोक यायचे आणि ३ घंटे श्रवणभक्ती करून निघून जायचे. त्यानंतर कथावाचनातील शेवटचा अर्धा घंटा धर्मजागृती करण्यासाठी देणे चालू केले. वर्ष २०२२ मध्ये भुसावळ येथे ‘अन्नप्राशन संस्कार’ आणि ‘विद्यारंभ संस्कार’ हे कार्यक्रम आयोजित केले होते. हे दोन्ही १६ संस्कारांमधील एक संस्कार आहेत; पण सिंधी समाजाला त्याची माहिती नव्हती. तेथे पहिल्याच वेळी ८७ मुलांवर विद्यारंभ संस्कार आणि अन्नप्राशन संस्कार करण्यात आले.’
– श्री. प्रकाश सिरवाणी, विदर्भ धर्मप्रचारक, भारतीय सिंधू सभा, अमरावती.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !